crime
crime esakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : लग्नाच्या आमिषाने भावाच्या मित्राचा अत्याचार; आरोपी अटकेत

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - भावासोबत घरी आलेल्या त्याच्या मित्राने ओळख वाढवीत लग्नाच्या आमिषाने अत्याचार केला. ही घटना एप्रिल महिन्यात घडली. विशेष म्हणजे, पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्याने लग्नास नकार देत तिला मारहाण करून धमकी दिली. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विशाल बंडू पवार (वय २५, रा. पुंडलिकनगर, गल्ली क्र. सहा) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली.

याप्रकरणी मुकुंदवाडीतील १८ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या मोठ्या भावासोबत त्याचा मित्र आरोपी विशाल पवार हा घरी येत असे. दरम्यान, पीडिता आणि विशाल यांची ओळख झाली. दोघांत प्रेम झाले. एप्रिल २०२३ मध्ये एक दिवस आरोपी विशाल हा घरी कोणी नसताना तिच्या घरी गेला आणि तिथून तिला घेत त्याच्या घरी घेऊन गेला. दरम्यान, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे म्हणत बळजबरी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो नेहमीच तिला त्याच्या घरी नेत लग्नाच्या आमिषाने अत्याचार केले.

जून २०२३ मध्ये हे प्रकरण आरोपीसह त्याच्या आईला माहीत झाले होते. आरोपीसह त्याच्या आईने पीडितेला मिनी घाटीत दाखल केले असता, ती गर्भवती असल्याचे समोर आले. तरीही त्याने मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे सांगत सात महिने झाल्यानंतर मी तुझ्यासोबत लग्न करून माझ्या घरी घेऊन जातो, असे आश्वासन दिले. त्यानंतर तो तिच्या घरी येत जात असे.

२१ नोव्हेंबररोजी तो पीडितेच्या घरी गेला आणि तिला गर्भपात करण्यासाठी बळजबरी करू लागला. त्यावर तिने नकार दिला असता, त्याने तिला मारहाण केली. २२ नोव्हेंबरला त्याने मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, काय करायचे ते कर असे म्हणत तिला ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच तपास अधिकारी तथा उपनिरीक्षक संदीप काळे यांनी आरोपी पवार याला अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT