Ahmad Kureshi
Ahmad Kureshi 
छत्रपती संभाजीनगर

हिमरु नक्षीकामाचे आधुनिक प्रणेते अहमद कुरेशी यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर

मनोज साखरे

औरंगाबाद : निर्भीड व धडाडीचे पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक अनंत भालेराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार हिमरू नक्षीकामाचे आधुनिक प्रणेते अहमद कुरेशी यांना जाहीर झाला. २६ ऑक्टोबरला अनंत भालेराव यांच्या पुण्यतिथीदिनी हा पुरस्कार छोट्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या कार्यवाह डॉ. सविता पानट यांनी दिली.


पत्रकारिता, साहित्य, कला, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील एका नामवंत व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी या तीनही क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्वांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यंदा हिमरू वस्त्रांवर विणल्या जाणाऱ्या नक्षीकामांतील आधुनिक काळातील तज्ज्ञ अहमद सईद कुरेशी यांना दिला जाणार आहे. ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

७८ वर्षांचे अहमद कुरेशी यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासूनच या क्षेत्रात काम करायला सुरवात केली. हिमरू नक्षीबाबत त्यांना विशेष आकर्षण निर्माण झाले. त्या काळी अतिशय मोजक्याच नक्षींचा वापर हिमरूकामात केला जात होता. अहमद कुरेशी यांनी विविध प्रकारच्या नक्षींचे आरेखन करून त्यांचा वापर करण्यासाठी वीणकरांना प्रोत्साहन दिले. पारंपरिक शैलीचा गाढा अभ्यास करून नवीन नक्षी त्यांनी तयार केली. अजिंठा लेण्यांतील कमळचित्रांना त्यांनी पहिल्यांदा हिमरूत आणून ही कलात्मक शैली लोकप्रिय केली. नवीन नक्षीकाम तरुण विणकर स्त्री-पुरुषांना शिकविण्यासाठी अहमद कुरेशी सदैव आग्रही राहिलेले आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT