Voter List
Voter List Sakal
छत्रपती संभाजीनगर

Voter List : मतदार याद्या बदलाचे षड्‍यंत्र; ठाकरे गटाचा आरोप, पदाधिकारी करणार पडताळणी

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार असलेल्या मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये निवडणूक आयोगाला हाताशी धरून बदल केले जात आहेत. राज्यभर हा प्रकार सुरू आहे, असा आरोप पक्षाचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी (ता.२१) झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला.

शिवाय शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्यांमध्ये होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवावे. आतापर्यंत काय बदल करण्यात आले आहेत, याची पडताळणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केल्या. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शासनामार्फत मतदार याद्यांच्या पुनर्रिक्षण व नवीन नोंदणीची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे.

ही प्रक्रिया करताना सत्ताधारी पक्षांना फायदा होईल, यासाठी षड्‍यंत्र रचले जात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्‍वभूमीवर घोसाळकर यांनी मंगळवारी औरंगपुरा येथील शिवसेना भवन येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, ‘‘मतदार याद्यांच्या पुनर्रिक्षण कार्यक्रमापूर्वी शिक्षकांमार्फत राबविला जात होता. मात्र, आता खासगी एजन्सीमार्फत ही कामे सुरू आहेत.

या एजन्सी सत्ताधारी पक्षांना फायदा व्हावा, यासाठी काम करत असून, मोठ्या संख्येने मतदार वगळणे, मतदार याद्यांची फोड करणे, असे प्रकार सुरू आहेत. त्याची दखल पक्षप्रमुखांनी घेतली आहे. त्यांच्या सूचनेनुसार आज बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाला हाताशी धरून सुरू असलेले हे षड्‍यंत्र हाणून पाडा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

विशेषतः शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात हे प्रकार सुरू आहे’’, असा आरोप घोसाळकर यांनी केला. जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, उपजिल्हा प्रमुख नंदकुमार घोडेले, जयवंत ओक, राजू राठोड, अरविंद धीवर, किशोर कच्छवाह, संतोष जेजुरकर, राजू वैद्य, चेतन कांबळे, सुनीता आउलवार, सुनीता देव, स्मिता घोगरे, ऋषिकेश खैरे, सचिन खैरे, मनोज गांगवे, सीताराम सुरे उपस्थित होते.

नंदकुमार घोडेले यांच्यावर‘पश्चिम’ची जबाबदारी

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावर पश्चिम विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे घोसाळकर यांनी बैठकीत जाहीर केले. पश्चिम विधानसभा मतदार संघातील अडीअडचणी सोडविण्याकडे लक्ष द्यावे, बुथनिहाय मतदार याद्यांची तपासणी करून घ्यावी, अशी सूचना यावेळी घोसाळकर यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT