Epos machine server down Beneficiaries
Epos machine server down Beneficiaries sakal
छत्रपती संभाजीनगर

स्वस्त धान्यापासून लाभार्थी वंचित; ई-पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन

सकाळ वृत्तसेवा

चाकूर/कळंब : स्वस्त धान्याचे वितरण करण्यासाठी असलेली बायोमेट्रीक प्रणाली लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. परिणामी, रेशनकार्डधारकांना धान्य मिळत नसून, स्वस्त धान्य दुकानांसमोर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरित करण्यात येणारे स्वस्त धान्य विकत घेण्यासाठी ई- पॉस मशिनवर नोंदणी करावी लागते, आधार कार्डच्या आधारे बायोमेट्रीक प्रणाली पूर्ण झाल्याशिवाय धान्य मिळत नाहीत. पण, मागील आठ दिवसांपासून बायोमेट्रीक प्रणालीचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन वितरण थांबले आहे. धान्यासाठी मजूर, शेतकरी यांच्यासह सर्वसामान्यांना तासनतास दुकानाच्या समोर थांबावे लागत आहे.

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत धान्याचे वाटप सुरु असते दोन दिवसांत पॉस मशिन सुरु होतील, असे दुकानदारांनी सांगितले होते. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून मशिन चालू झाल्या

नसल्यामुळे धान्य वाटप ठप्प झाले आहे. यातच अनेक लाभार्थी धान्य देण्यासाठी हुज्जत घालत असल्याने सोमवारी (ता.२८) कळंब तालुक्यातील धान्य दुकानदारांकडून पॉस मशिन तहसील कार्यालयात जमा करण्यात येणार आहे, असा इशारा कळंब धान्य दुकानदार संघटनेने दिला आहे. चाकूर तालुक्यात १११ स्वस्त धान्य दुकानदार असून, एक लाख ४० हजार लाभार्थी आहेत. यापैकी ४५ टक्के धान्याचे वाटप झालेले असून, ५५ टक्के लाभार्थ्यांना धान्य मिळालेले नाही.

आठ गावातील लाभार्थी वंचित

कोरोनाच्या काळात शासनाच्या वतीने मोफत धान्याचे वितरण करण्यात आले. यावेळी पॉस मशिनमधील तांत्रिक अडचणीमुळे चाकूर तालुक्यातील आठ गावांतील लाभार्थ्यांना मोफतचे गहू व तांदूळ हे धान्य मिळाले नाही. या लाभार्थ्यांनी वारंवार पुरवठा विभागाची संपर्क साधला. परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचा लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.

''सर्व्हर डाऊन असल्यामुळे पॉस मशिन बंद आहेत. दोन- तीन दिवसांत त्या चालू होतील. नंतर धान्य वाटपासाठी मुदत वाढ दिली जाईल.''

- बालाजी चितळे, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग, चाकूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Heatwave Alert: दिल्लीत उष्णतेचा कहर! दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत कामगारांना सुट्टी, उष्णतेच्या लाटेमुळे LG चा मोठा निर्णय

All Eyes On Rafah: गाझा पट्टीतील राफा शहर का आहे खास? इस्राइल का करत आहे टार्गेट? जाणून घ्या

Ind vs Ban T20 WC 24 : भारत-बांगलादेश सामना कुठे, कधी अन् केव्हा पाहाणार; जाणून घ्या सर्व डिटेल्स एका क्लिकवर

Pushpa 2 New Song : 'अंगारो-द कपल साँग' वर थिरकले रश्मिका-अल्लू अर्जुन; BTS व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : स्टंट बाजीच्या नादात आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटा फोडला- अमोल मिटकरी

SCROLL FOR NEXT