11th admission 11th admission
छत्रपती संभाजीनगर

FYJC Admission 2021: अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम

सीईटी रद्द झाल्याने प्रवेश प्रक्रिया सुरुळीत होईल अशी अपेक्षा शहरातील महाविद्यालयांना होती. मात्र यंदा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गुण मिळाले आहेत. त्यामुळे विज्ञान पाठोपाठ वाणिज्य शाखेला प्रवेशाकडे ओढा वाढलेला दिसून येत आहे

संदीप लांडगे

न्यायालयाने अकरावीसाठी घेण्यात येणारी सीईटी देखील रद्द केल्यामुळे शहरातील नामवंत महाविद्यालयांचा कटऑफ वाढला आहे

औरंगाबाद: यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना छपर फाड के गुण मिळाले आहेत. आता न्यायालयाने अकरावीसाठी घेण्यात येणारी सीईटी देखील रद्द केल्यामुळे शहरातील नामवंत महाविद्यालयांचा कटऑफ वाढला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी स्पर्धा वाढली आहे. दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. परंतु औरंगाबाद शहरातील संस्थांकडून होणारी मागणी यामुळे यंदापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन करण्यात आली आहे. तर शाळा बंद असल्याने यंदा दहावीचा निकाल हा मागील इयत्तेच्या मूल्यांकन पद्धतीनुसार जाहीर करण्यात आल्याने शासनाने सीईटी परीक्षा जाहिर केली होती. मात्र न्यायालयाने सीईटी रद्द केल्याने प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.

सीईटी रद्द झाल्याने प्रवेश प्रक्रिया सुरुळीत होईल अशी अपेक्षा शहरातील महाविद्यालयांना होती. मात्र यंदा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गुण मिळाले आहेत. त्यामुळे विज्ञान पाठोपाठ वाणिज्य शाखेला प्रवेशाकडे ओढा वाढलेला दिसून येत आहे. असे असूनही प्रवेशाबाबत खात्री वाटत नसल्याने आणि शाळांकडून शुल्कासाठी अजून टीसी न मिळाल्याने मुल येवून चौकशी करुन जात असल्याचे महाविद्यालयांनी म्हटले आहे. पालक - विद्यार्थी यांच्यातील समज-गैरसमज दूर करण्यासाठी समुपदेशन केले जात असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

अकरावी प्रवेश ऑनलाइन की ऑफलाइन अशी संभ्रमावस्था विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आहे. शहरामध्ये अकरावीचे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु पुढील आदेश मिळेपर्यंत प्रवेश निश्चिती करु नका अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मुलांमधील ही द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी प्राध्यापकाची समुपदेशन समिती गठीत केली असल्याचे प्राचार्यांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Sends Notice to South Indian Stars: साउथ इंडियन फिल्मस्टार विजय देवरकोंडा, राणा दग्गुबत्ती, प्रकाश राज 'ED'च्या रडारावर!

Prithvi Shaw: भारताच्या क्रिकेटरनं तब्बल १७ किलो वजन केलं कमी! पीटरसन म्हणतोय, 'पृथ्वी शॉला कोणीतरी हे दाखवा'

Manikrao Kokate Rummy Video: कोकाटेंचा 'पत्ते', तटकरेंच्या अंगावर, चव्हाणांचा राडा, दादांना गोत्यात आणणार?

Crime News : पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; मृतदेह टाकला उसाच्या शेतात, तोंडावर वर्मी घाव, मुलगा आहे सैन्य दलात

ट्रम्प यांच्या दाव्यावरून गोंधळ, १ विधेयक मंजूर, न्यायमूर्तींना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव अन्...; संसदेत पहिल्या दिवशी काय घडलं?

SCROLL FOR NEXT