अद्रक संशोधन केंद्र
अद्रक संशोधन केंद्र sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : अद्रक संशोधन केंद्राचा प्रश्न लागणार मार्गी ; खुलताबाद तालुक्यात होणार सुविधा,कृषिमंत्री मुंडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापनेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून, या केंद्र स्थापनेसाठी त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

यासंदर्भात पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी डिसेंबर २०२२ व मार्च २०२३ मध्ये झालेल्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत मंत्री मुंडे यांनी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली होती. २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन कृषिमंत्र्यांनी तीन महिन्यांत अद्रक संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.

यासंदर्भात शासन स्तरावर काहीच कारवाई झाली नव्हती. अद्रक संशोधन केंद्र स्थापनेसाठी कमीत-कमी २० हेक्टर जागा लागते. मात्र, गल्लेबोरगाव येथे प्रस्तावित अद्रक संशोधन केंद्र स्थापनेसाठीची नियोजित जागा कमी पडत असल्याने खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील सरकारी जागेवर हे अद्रक संशोधन केंद्र उभारता येऊ शकते.

यासाठी कृषी विद्यापीठाने छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन संपादनासाठीची तत्काळ कार्यवाही करून हा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी कृषी विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले. स्वतंत्र समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली. बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी परिषद, कृषी विद्यापीठ, मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT