किराणा दुकानाला आग, कोट्यवधी रुपयांचे नुकसान
किराणा दुकानाला आग, कोट्यवधी रुपयांचे नुकसान sakal
छत्रपती संभाजीनगर

हिंगोली: किराणा दुकानाला आग, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

राजेश नागरे

हिंगोली : शहरातील गणपती चौक परिसरात असलेल्या आर. के. ट्रेडिंग किराणा साहित्य विक्रीच्या दुकानाला गुरुवारी (ता.सात) मध्यरात्री आग लागली. यात जवळपास एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाने चार ते पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले तोपर्यंत दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते. हिंगोली शहरातील गणपती चौक परिसरात राम अग्रवाल यांचे आर. के.ट्रेडिंग किराणा साहित्य विक्रीचे होलसेल दुकान आहे. गुरुवारी रात्री अग्रवाल हे दुकान बंद करून नेहमीप्रमाणे घरी गेले होते.

मध्यरात्री दुकानातून धूर निघू लागला त्यानंतर काही वेळातच दुकानातून आगीचे गोळे बाहेर पडत होते. या भागातील नागरिकांनी या घटनेची माहिती श्री. अग्रवाल यांच्यासह पोलीस व अग्निशमन दलाला दिली. तसेच नागरिक देखील येथे जमा झाले. घटनास्थळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. आग विझविण्यासाठी कळमनुरी , औंढा नागनाथ , वसमत येथील अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले . तसेच शहरातील दोन खासगी टँकरद्वारे आगीवर पाणी ओतण्यास सुरुवात केली. शुक्रवारी ता.आठ सकाळी आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व किराणा साहित्य जळून खाक झाले होते. या आगीमध्ये सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT