sambhaji nagar
sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : संभाजीनगरच्या जॅकवेलच्या कामातील अडथळा अखेर दूर

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या जॅकवेलच्या कामातील अडथळा अखेर दूर झाला आहे. जॅकवेलच्या कामासाठी ‘नियंत्रित स्फोट’ (कंट्रोल ब्लास्टिंग’) करण्याच्या कामाला प्रारंभ झाला असून, तब्बल सहा मीटर खोलीपर्यंत ब्लास्टिंग करण्यात येणार आहे.

शहराच्या २ हजार ७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनी हे काम करीत आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी अशी ३९ किलोमीटरची मुख्य जलवाहिनी टाकण्याचा कामाला प्रारंभ झाला असून, शहरातील अंतर्गत जलवाहिनी टाकण्याची कामेही सुरू आहेत. महत्त्वाचा टप्पा म्हणजे जायकवाडीतील जॅकवेलचे काम होते. यासाठी १९ मीटरपर्यंत खोदकाम केले जाणार आहे.

१३ मीटरचे खोदकाम जेसीबी मशीनच्या माध्यमातून करण्यात आले. यानंतर काळा पाषाण लागला. जेसीबीच्या सहाय्याने पाषाण फोडणे शक्य नसल्याने काम बंद होते. यामुळे प्राधिकरणाने जलसंपदा विभागाकडे कंट्रोल ब्लास्टिंगची परवानगी मागितली. याबाबत उच्च न्यायालयाने देखील आदेश दिले होते. यानंतरही जलसंपदा विभागाने परवानगी राखून ठेवली होती. माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर परवानगीचा कागद अखेर पुढे सरकला.

१५ फेब्रुवारीपर्यंत काम होईल पूर्ण

ब्लास्टिंगसाठी पाषणावर वीस ते तीस छिद्रे तयार करण्यात आली आहेत. त्यातून ‘नियंत्रित स्फोट’ केला जाईल. अतिशय काळजीपूर्वक हे काम केले जात आहे. तीन मीटरप्रमाणे दोन टप्प्यात हे काम होणार आहे. ब्लास्टिंगचे हे काम १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल. यानंतर जॅकवेलच्या मुख्य कामाला प्रारंभ होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT