Ajit pawar
Ajit pawar sakal
छत्रपती संभाजीनगर

Ajit Pawar : महानंद दुध संघ संचालकांनी स्वखुशीने राजीनामे दिलेत; कुणालाही दमदाटी केली नाही

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - महानंद दुध संघ हा राज्यस्तरावरील संघ आहे. आपणही त्यात संचालक होतो. हा दुध संघ अडचणीत सापडल्याने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (डीडीबी) देण्याचे प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, विरोधकांना मुद्दा नसल्याने ते आरोप करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती संभाजीनगरात सांगीतले.

महानंद दुध संघाचा विषय सध्या गाजत आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, या दुध संघाची परिस्थिती सध्या चांगली नाही. आम्ही संघात असताना दीडशे कोटी रुपये डिपॉझीट केले होते. आता या दुध संघावर सव्वा दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचे कर्ज आहे. काही वर्षांपूर्वी जळगाव दूध संघाची देखील अशीच परिस्थिती होती. हा जळगाव दुध संघ एनडीडीबीकडे दिला, त्यानंतर जळगाव दूध संघाची परिस्थिती सुधारली आहे.

महानंद दुध संघ आम्हाला चालवायला द्या, असे सांगत एनडीडीबी आता पुढे आली आहे. विरोधकांना माहिती नसताना काही आरोप करतात. नेहमी गुजरातला पळविल्याची भाषा केली जाते. महानंदाचा तोटा भरून काढण्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत. मात्र विरोधक ५० एकरची मोक्याची जागा जाणार, अशी आवई पिटत आहे. हे धादांत खोटे आहे.

महानंदच्या संचालक मंडळांतील बहुतेकांनी स्वखुशीने राजीनामे दिले आहेत. त्यातही विरोधकांनी राजीनानमे हे दमदाटी करुन घेतल्याचे सांगत आहे, असे असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी. महानंद अद्याप एनडीडीबीला देण्यात आलेला नाही असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT