sambhaji nagar
sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation Survey : सर्वेक्षणाची मोहीम फत्ते; अहवाल शासनाला सादर ; जिल्ह्यातील चित्र,अनेक ठिकाणी नागरिकांची घरे आढळली बंद

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात २३ जानेवारी २०२३ ते २ फेब्रुवारी २०२४ दरम्यान मराठा समाज, खुला प्रवर्ग तसेच आरक्षित प्रवर्गातील कुटुंबांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे काही तालुक्यांमध्ये ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही जास्तीचे काम करण्यात आले आहे. काही ठिकाणी कुटुंबीयांनी सर्वेक्षणास नकार दिला तर काही ठिकाणी घरे बंद असल्याचे सर्वेक्षणादरम्यान आढळून आले. या सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

पैठण शहरासह तालुक्‍यात सर्वेक्षण पूर्ण

७९ हजार ५९४ कुटुंबांपैकी ७८ हजार ५५४ कुटुंबांना भेटी

पैठण, ता. ४ : राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून पैठण तालुक्यात युद्धपातळीवर सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. यासाठी नेमण्यात आलेल्या २२ सुपरवायझर व ५६८ प्रगणकांकडून १ फेब्रुवारीपर्यंत एकूण ७९ हजार ५९४ कुटुंबांपैकी ७८ हजार ५५४ कुटुंबांच्या घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाकडून गावोगावी दवंडी देण्यासह ग्रामपंचायतींच्या सूचनाफलकांद्वारेदेखील जनजागृती करण्यात आली. नागरिकांनीही दारावर येणाऱ्या प्रगणकांना परिपूर्ण माहिती देत बिनचूक सर्वेक्षणाच्या प्रक्रियेस हातभार लावला. सर्वेक्षण मोहिमेच्या कालावधीत तालुक्यातील सर्व तहसीलचे सर्व अधिकारी, कर्मचारी व संबंधित यंत्रणेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापल्या स्तरावरून अहवाल पाठविण्याचे कामकाज पार पाडले. शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी, मंडळ अधिकारी अशा सर्वच प्रगणकांनी गेल्या आठ ते नऊ दिवसांत मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्याचे काम युद्ध स्तरावर पार पाडले. गावोगावी अन् दारोदारी प्रगणकांनी धडक देऊन सर्वेक्षण केले. नागरिकांनीही प्रगणकांना पूर्णतः सहकार्य केल्याचे यादरम्यान पहावयास मिळाले.

सिल्लोडमध्ये सर्वेक्षणास १४६६ नागरिकांचा नकार

८४ हजार ७१० कुटुंबांची माहिती संकलित

सिल्लोड, ता. ४ (बातमीदार) : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने तालुक्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. यात ८४ हजार ७१० कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली असून सिल्लोड शहरात १४६६ नागरिकांनी माहिती देण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुरवातीला ऑनलाइन सर्वेक्षणासाठी अॅप डोकेदुखी ठरले होते. परंतु, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. सर्वांसाठी २०११ च्या जनगणनेचा निकष ठेवण्यात आला होता. यामध्ये १० टक्के लोकसंख्यावाढ ग्राह्य धरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तालुक्यात ८४ हजार ७१० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी ४ लाख १६ हजार २२२ नागरिकांच्या भेटी प्रगणकांनी घेतल्या. तालुक्यात ८४० प्रगणक ग्रामीण भागात तर ५६ प्रगणक शहरात अशा एकूण ८९६ प्रगणकांनी घरोघरी जाऊन माहिती संकलनाचे काम केले.

शहरात ३६३ घरे कुलूपबंद

सिल्लोड शहरात १४६६ जणांचा माहिती देण्यास नकार सर्वेक्षणाचे काम तालुक्यात पूर्ण झाले असताना सिल्लोड शहरात १४६६ जणांनी माहिती देण्यास नकार दिल्यामुळे प्रशासनाच्या अडचणींत वाढ झाली असून दुसरीकडे शहरात ३६३ घरे बंद आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

फुलंब्रीत ४० हजार कुटुंबांच्या भेटी

४३३ प्रगणक, १४ पर्यवेक्षकांनी घेतला पुढाकार

फुलंब्री, ता. ४ : फुलंब्री तालुक्यात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून, ४० हजार ६३९ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये मराठा प्रवर्ग, खुला व राखीव प्रवर्गाचा समावेश आहे. या सर्वेक्षणात ४३३ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली होती तर १४ पर्यवेक्षकांनी या सर्वेक्षणात काम केले आहे.

फुलंब्री तालुक्यातील ९३ गावे असून मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक बाबींचे सर्वेक्षण करण्यात आले. घरोघरी प्रगणकांनी भेटी देऊन अॅपद्वारे माहिती भरून घेतली. स्थलांतरित कुटुंबांचा अपवाद वगळता सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. २३ जानेवारीपासून तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ४३३ प्रगणक तर १४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करून सर्वेक्षणाचे कामकाज घेण्याचे सांगितले होते. सुरवातीला ॲपमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. मात्र, त्यानंतर ऑनलाइन सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती केल्यानंतर ॲप चांगल्या पद्धतीने सुरू झाले होते.

तालुक्यात चाळीस ४० हजार ६३९ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तालुक्यातील मराठा, इतर खुला व राखीव संवर्गांचे सर्वेक्षण २०२४ तहसीलदार तथा नोडल अधिकारी अधिकारी डॉ. कृष्णा कानगुले, सहायक नोडल अधिकारी संजीव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे विहित कालावधीत पूर्ण करण्यात आले.

सर्वेक्षणाचा तपशील

तालुक्यातील एकूण गावे : ९३

सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेले प्रगणक : ४३३

सर्वेक्षणात नियुक्त पर्यवेक्षक : १४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT