Maratha Reservation Survey : साडेतीन लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण ; मराठा आरक्षण सर्वेक्षणाचा आज शेवटचा दिवस, पाच टक्केच काम बाकी

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात दोन हजार ९११ प्रगणक, १९६ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून ता.२३ जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता.एक) तीन लाख ४२ हजार २८ घरांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.
jalna
jalnasakal

जालना : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात दोन हजार ९११ प्रगणक, १९६ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून ता.२३ जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता.एक) तीन लाख ४२ हजार २८ घरांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित काम हे शुक्रवारपर्यंत (ता.दोन) पूर्ण करण्याची मुदत असून शंभर टक्के सर्वेक्षण होण्याची शक्यता आहे. जवळपास ९५ टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.

गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेकडून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण सिद्ध करण्यासाठी युजर फ्रेंडली मोबाईल एप्लीकेशन प्रणालीच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वेक्षण अचूक आणि परिपूर्ण करण्यासाठी मागील आठ दिवसांपासून जिल्हा प्रशासनामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाच्या कामासाठी दोन हजार ९११ प्रगणक, १९६ पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील कुटुंब प्रमुखाचे सर्वेक्षण करताना १५४ प्रश्‍नांची ऑनलाइन उत्तरे भरावी लागत आहेत. त्यामुळे एक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी सुमारे अर्धा ते एक तासाचा वेळ जात आहे.

jalna
Maratha Reservation : कायदा होईपर्यंत थांबणार नाही : मनोज जरांगे ; पाच महिन्यांनंतर आले घरी,गावात जंगी स्वागत, कुटुंबीयांकडून औक्षण

मात्र, सर्वेक्षणासाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन लाख ६८ हजार ९० घरे आहेत. या घरांमध्ये १८ लाख ४० हजार ४४७ लोकसंख्या आहे. या सर्व घरांचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यात मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करताना १५४ प्रश्‍न आहेत. तर इतर जातीच्या प्रवर्गातील सर्वेक्षणाचे मोजके प्रश्‍न आहेत.

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण सिद्ध करून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावला जाणार आहे. जिल्ह्यात गुरूवारी (ता.एक) कार्यालयीन वेळेच्या अखेरपर्यंत तीन लाख ४२ हजार २८ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. परिणामी जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम हे ९२ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. सर्वेक्षणाचा शुक्रवार (ता.दोन) शेवटचा दिवस असून जिल्हा प्रशासनाकडून शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

तालुकानिहाय सर्वेक्षणाची आकडेवारी

तालुका लोकसंख्या एकूण घरे आतापर्यंत झालेले सर्वेक्षण

जालना २,५६,८७६ ५१,३७५ ४४,६९६

बदनापूर १,६९,४२८ ३३,८८६ ३३,३७२

भोकरदन ३,४२,२२३ ६८,४४५ ६२,९६९

जाफराबाद १,७९,४९१ ३५,८९८ ३४,३८०

अंबड २,८१,३८० ५६,२७६ ५२,१३८

घनसावंगी २,३१,९३२ ४६,३८६ ४२,५४५

परतूर १,९५,३९३ ३९,०७९ ३६,८३५

मंठा १,८३,७२४ ३६,७४५ ३५,०९३

एकूण १८,४०,४४७ ३,६८,०९० ३,४२,०२८

बदनापूर तालुक्याचे ९८ टक्के सर्वेक्षण

जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये बदनापूर तालुका सर्वात आघाडीवर असून ९८.५ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यापाठोपाठ जाफराबाद तालुक्यात ९५.८ टक्के, मंठा तालुक्यात ९५.५ टक्के, परतूर तालुक्यात ९४.३ टक्के, अंबड तालुक्यात ९२.२ टक्के, भोकरदन तालुक्यात ९२ टक्के, घनसावंगी तालुक्यात ९१.६ टक्के तर सर्वात कमी जालना तालुक्यात ८७ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com