massia
massia massia
छत्रपती संभाजीनगर

MASSIA Election: मसिआच्या अध्यक्षपदी नारायण पवार यांची बिनविरोध निवड

प्रकाश बनकर

औरंगाबाद: मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर(Marathwada Association of Small Scale Industries & Agriculture) संघटनेच्या २०२१-२२ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता.५) पार पडली. या सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी नारायण पवार (narayan pawar) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

चिकलठाणा येथील मसिआच्या कार्यालयात सभा पार पडली. नूतन वर्षासाठी एकूण २७ कार्यकारणी सदस्य निवड प्रक्रिया पार पडली. कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी (वाळूज) अनिल पाटील, (चिकलठाणा) किरण जगताप, सचिव (वाळूज) गजानन देशमुख (चिकलठाणा) चेतन राऊत, सहसचिव (वाळूज) कमलाकर पाटील,(चिकलठाणा) राजेंद्र चौधरी कोषाध्यक्ष (वाळूज) अभिषेक मोदानी, (चिखलठाणा) संदीप अडतिया, प्रसिद्धीप्रमुख राहुल मोगले, सहप्रसिद्धीप्रमुख (चिकलठाणा) सुरेश खिल्लारे, संपादक उद्योग संवाद राजेश मानधनी, सहसंपादक श्रीराम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

वाळूज कार्यकारणी सदस्य दुष्यंत आठवले, सचिन देशमुख, अर्जुन गायकवाड, प्रल्हाद गायकवाड, आनंद पाटील, सर्जेराव साळुंखे, सुमित मालानी, यांचा समावेश आहे. चिकलठाणा विभाग- अभय हंचनाळ, भगवान राउत, बसवराज मोरखडे, मनीष अग्रवाल, रवि आहेर, सचिन गायके, मनीष गुप्ता, संजय काकडे, नीरज खेमका, कुंदन रेड्डी, रोहन येवले यांचा समावेश आहे. या निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून विजय लेकुरवाळे यांनी काम पाहिले.
वार्षिक सर्वसाधारण सभेत मावळते अध्यक्ष अभय हंचनाळ, सचिव भगवान राऊत,कोषध्यक्ष बसवराज मोरखंडे यांनी उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमात मसिआच्या इमारतीचे बांधकाम वेळेत पुर्ण केल्याबद्दल आर्किटेक्ट कमल राव, ठेकेदार पालवणकर, प्रकाश कोयते यांचा सत्कार करण्यात आला. वर्षभर उत्कृष्ट काम करणाऱ्यास उत्कृष्ट कार्यकारिणी सदस्य (बेस्ट ईसी) पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार गजानन देशमुख यांना देण्यात आली. नव्याने होणाऱ्या सभागृहासाठी माजी अध्यक्ष सुनील किर्दक यांनी देणगी दिली आहे. केशव पारटकर, संदीप नागोरी,सुनील भोसले, भारत मोतिंगे, संतोष कुलकर्णी,किशोर राठी,ज्ञानेश्‍वर राजाळे, व मिसाआचे सदस्य उपस्थित होते.

गेल्या वर्षभरापासून राबवण्यात येत असलेली इंडस्ट्रियल ऍकॅडमीक प्रोजेक्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम. यूएनडीपी पुरस्कृत प्रोग्रॅम हे प्रकल्प यापुढेही सुरु राहील. यासह ऑक्सिजन रिच एमआयडीसी प्रकल्पांर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात येईल. चिकलठाणा एमआयडीसीतील रस्त्यांचा प्रलंबित प्रश्न, भाडेकरू उद्योजकांचा प्रश्न आणि औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांबाबत पाठपुरावा करण्यात येईल. तसेच जानेवारी २०२३ मध्ये प्रस्तावित असलेल्या एडवांटेज महाराष्ट्र एक्सपोचे पूर्व नियोजनही करण्यात येईल.
-नारायण पवार, अध्यक्ष, मसिआ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT