photo 
छत्रपती संभाजीनगर

ही वाहने होतायेत बंद : पण का ते वाचा

अनिल जमधडे

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ‘भारत स्टेज -४’ (बीएस फोर) मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी आरटीओ कार्यालयात एक एप्रिलपासून थांबविण्यात येणार आहे. यापुढे ननीन भारत स्टेज -६ मानांकन वाहनांचीच नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे बीएस फोर वाहनांची खरेदी करणाऱ्यांनी आपले वाहन ३१ मार्च २०२० पूर्वी नोंदणी करून घेणे आवश्यक असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश

देशभरात एक एप्रिलनंतर भारत स्टेज-चार (बीएस फोर) मानांकन नसलेली वाहने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विक्री व नोंदणी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वाहनधारकांनी ‘बीएस-फोर’ मानांकनाची वाहने खरेदी केली आहे; अशा वाहनधारकांनी त्याची नोंदणी ३१ मार्चपूर्वी करून त्यांना नोंदणी क्रमांक जारी होणे आवश्यक आहे. ही वाहने ३१ मार्चपूर्वी नोंदणी न झाल्यास त्यांना रस्त्यावर वापरता येणार नाही. ३१ मार्च किंवा त्यापूर्वी होणारी नोंदणीची गर्दी पाहता तसेच ऐनवेळी कागदपत्रांत काही त्रुटी उद्भवण्याची शक्यता आहे. 

वाहने नोंदणी झाल्याची खात्री आवश्यक

शुल्क व कर भरल्याने, व्हीआयपी क्रमांकाची फी भरल्याने, मोटार वाहन निरीक्षकाकडे वाहन तपासणीसाठी सादर केल्याने अथवा मोटार वाहन निरीक्षकाने तपासणी केल्याने वाहनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही. वाहनास नोंदणी क्रमांक जारी झाल्यावरच सदर वाहनाची नोंदणी प्रक्रिया कायदेशीररीत्या पूर्ण होते. सर्व वाहनधारकांनी त्यांच्या मालकीची वाहने नोंदणी झाली असल्याबाबत खात्री करावी. 

येथे करा खात्री 

ज्या वाहनमालकांना वाहनाचे मूळ स्मार्ट कार्ड आरसी, नोंदणी पुस्तक प्राप्त झाले नाही त्यांनी त्यांचा वाहन क्रमांक www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध पर्यायामध्ये तपासून घ्यावा. वाहनधारकांची गैरसोय होऊ नये. यासाठी ३१ मार्चपूर्वी वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन श्री. मैत्रेवार यांनी केले. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे याची उपस्थिती होती. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : इराणवर भारतीय तळांवरून हल्ले? अमेरिकन कर्नलच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन, काय आहे सत्य?

Date Prices Rise : रमजानच्या पार्श्वभूमीवर सांगलीत खजुरांना मोठी मागणी; दरात १० टक्क्यांची वाढ, बाजारात विविध देशांतील खजूर उपलब्ध

Healthy Laddu Recipe: साखर न वापरताच बनवता येतात 'हे' लाडू; लहानांपासून मोठ्यांपर्यंत अन् डायबेटिक पेशंटही खाऊ शकतील

Sugarcane Field Fire Tragedy : उसाच्या फडात होरपळून वृद्धाचा मृत्यू, शेतातील गवत पेटविताना घडला प्रकार, पलूस तालुक्यातील घटना

Karnataka CM Rotation Issue : कर्नाटकच्या राजकारणात होणार मोठा गेम? '...तर वेगळा निर्णय घेऊ!' डी. के. शिवकुमार यांचा हायकमांडला थेट इशारा; सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात?

SCROLL FOR NEXT