Itawa Gram Panchayat And Aurangabad News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : इटावाच्या उपसरपंचावरील अविश्वास ठरावावर चर्चेसाठी विशेष सभा

मात्र गंगापूर तहसीलदारांची नोटीस दिशाभूल करणारी

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : वाळूज परिसरातील इटावा ग्रामपंचायतच्या उपसरपंचावर दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी मंगळवार म्हणजे १५ फेब्रूवारी निश्चित करण्यात आली. मात्र या संदर्भात ग्रामपंचायत सदस्यांना उपस्थितीबाबत तहसीलदारांनी दिलेली नोटीस दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे या नोटिशीची परिसरात खमंग चर्चा सुरू आहे. वाळूज परिसरातील इटावा ग्रामपंचायतच्या (Gram Panchayat) उपसरपंच वंदना घुले यांच्यावर ग्रामपंचायत सदस्य अण्णा गोरखनाथ व इतर सहा ग्रामपंचायत सदस्यांनी नऊ फेब्रुवारी रोजी अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यामुळे या ठरावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन तारीख १५ रोजी करण्यात आले आहे. (Special Meeting For Itawa Vice Sarpanch No Motion, Gangapur Tahsildar Notice Misguided)

मात्र ही नोटीस दिशाभूल करणारी असल्याचे समोर आले असून हा ठराव मंगळवारी आहे की, बुधवारी या संभ्रमात इटावा ग्रामपंचायतचे पदाधिकारी सापडले आहे. तहसीलदार, गंगापूर (Gangapur) यांनी बजावलेल्या नोटीसची चर्चा मात्र वाळूज (Waluj) परिसरासह संपूर्ण तालुक्यात खमंग स्वरूपात होत आहे.(Aurangabad)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT