Aurangabad news
Aurangabad news esakal
मराठवाडा

Aurangabad : कोंडीच्या ‘बाजारा’त व्यापारीही ‘बेजार’

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील मुख्य बाजारपेठ आजही तेवढ्याच जागेत आहे. पूर्वीच्या लोकसंख्येनुसार ही बाजारपेठ पुरेशी होती. लोकसंख्या वाढली, मात्र बाजारपेठेतील तीस ते चाळीस वर्षांपासून ज्या जागेत होती, आजही तेवढ्याच जागेत व्यापार व्यापार करीत आहेत. हे करताना व्यापाऱ्यांपुढील आव्हाने वाढली आहेत. यात सर्वांत महत्वाचा प्रश्‍न म्हणजे वाहतूक कोंडीचा. पूर्वी सण-उत्सवाच्या काळातच गर्दी होत असे, आता मात्र ही गर्दी रोज होत असल्याने वाहतूक कोंडीने व्यापारी बेजार झाला आहे.

बाजारपेठेतील आस्थापनांसमोर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली नाही. अर्धे रस्ते हे हॉकर्सनी व्यापलेले आहे. यात काही हॉकर्सकडून दुकानासमोर हातगाडी लावण्यासाठी भाडे आकारतात. मुख्य बाजारपेठेतील रस्ताही तेवढाच आहे. यामुळे सकाळी अकरानंतर बाजारेपेठेत गर्दी होते. यातून एका दुचाकीला वाट काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. विशेष म्हणजे, पैठणगेटहून गुलमंडीकडे जाणारा रस्ता हा वन-वे आहे. असे असताना अनेकजण राँगसाईड येऊन या बाजारपेठीतील कोंडीत भर घालतात.

अशीच परिस्थिती ही कुंभारवाडा, रंगार गल्ली, मच्छली खडक, औरंगपुरा, सिटी चौक, सराफा या भागाची आहे. नवीन बाजारपेठा झाल्या तरी जुन्या बाजारपेठेत जाऊन खरेदी करण्याची क्रेझ वेगळीच आहे. यामुळे सण-उत्सव असो वा नसो, कपडे, ज्वेलरी असो वा इतर खरेदीसाठी सर्वजण मुख्य बाजारपेठेकडे जातात. व्यापाऱ्यांतर्फे पार्किंगचे नियोजन केलेले नाही. पैठण गेटच्या डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था नावालाच केली आहे. मात्र, त्याचा वापरच होत नाही. दसरा-दिवाळीच्या काळात तर वाहनासाठी पैठणगेटपासून हा रस्ताच बंद केला जातो. हे अनेक वर्षांपासून हा प्रकार चालत आलेला आहे. यावर कुठलीही ठोस उपाय-योजना झालेली नाही. ते होणे अपेक्षित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT