मराठवाडा

शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याकडून डॉक्टरांना मारहाण

दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद): शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांच्या पुतण्याने घरासमोर वाहने पार्किंग होत असल्याच्या कारणाहून बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित लोंढे याना मारहाण केल्याची घटना शनिवार (ता.१२) दुपारी घडली. हल्लेखोरविरुद्ध कठोर कारवाही होत नाही तोपर्यंत शहरातील खासगी हॉस्पिटल न उघडण्याचा पवित्रा शहरातील डॉक्टर संघटनेकडून घेण्यात आल्याने दुपारपासून खासगी आरोग्य सेवेची यंत्रणा कोलमडलेली होती. याप्रकरणी कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान डॉक्टर लोंढे याना झालेल्या मारहाणीचा डॉक्टर, व्यापारी संघटनेकडून निषेध करण्यात येत आहे.

स्थानिक पक्षकार्यकर्त्यांच्या श्रेयवादामुळे उपजिल्हा रुग्णलयात सुरू असलेले कोविड लसीकरण केंद्र मागच्या काही दिवसांपूर्वी एका रात्रीत शहरातील पुनर्वसन सावरगाव परिसरातील विजया नर्सिंग होम येथे स्थलांतरित करण्यात आले. या हॉस्पिटलकडून विनामोबदला कोविड लसीकरणसाठी सहकार्य करण्यात येत आहे. दरम्यान लोंढे याच्या घरासमोर शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांचे निवास्थान असून लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने यांच्या घरासमोर पार्कींग होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून घरासमोर होत असलेल्या वाहन पार्किंगमुळे धुपूस सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान शनिवारी कल्पना नरहिरे यांचा पुतण्या बालाजी नरहिरे याने आमच्या घरासमोर वाहने का उभी करतात म्हणून विजया नर्सिंग होम या रुग्णलयाच्या बाहेर येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.रुग्णलयाच्या बाहेर काय गोंधळ सुरू आहे हे पाहण्यासाठी डॉ अभिजित लोंढे घराबाहेर येऊन आम्हाला का शिवीगाळ करत आहात असा प्रश्न उपस्थित करताच बालाजी नरहिरे यांनी डॉ लोंढे यांची कॉलर पकडून मारहाण करण्यात आली.अशी माहिती स्वतः अभिजित लोंढे यांनी दिली.याप्रकरणी कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेचा सर्व स्तरातून निषेध-

दरम्यान डॉ अभिजित लोंढे याना नाहक झालेल्या मारहाणीमुळे शहरातील डॉक्टर, व्यापारी, वकील, सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. हल्लेखोरविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी पोलिस ठाण्यात गर्दी करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : निसर्गाचा अप्रतिम नजारा पाहायचाय? मग, महाराष्ट्राच्या 'या' माऊंट एव्हरेस्टला नक्की द्या भेट

T20 WC 24 Team India : T20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT