beed 4.jpg 
मराठवाडा

अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागेवरच अंत झाला. 

मच्छिंद्र मोरे

वडवणी (बीड) : तालुक्यातील हिवरगव्हाण येथे मित्राला मोटरसायकलवर सोडून आपल्या उपळी गावाकडे येत असताना बाबी फाट्याजवळील गतिरोधकावर पाठीमागून येणाऱ्या एसटीबसने जोराची धडक देत मोटरसायकल स्वरांना उडवले. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही तरुण जागीच ठार झाले असल्याची घटना तीन सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील उपळी येथील तरुण ऋषिकेश राजु शेळके वय (२३ वर्षे), ओमप्रकाश श्रीमंत राऊत (वय २६ वर्ष) हे आपल्या मोटरसायकलवर हिवरगव्हाण येथील मित्राला सोडुन आपल्या गावी उपळीला येत होते. वाटेत बाबी फाट्या जवळ असणाऱ्या गतिरोधक जवळ पाठीमागून बीड वरून येणाऱ्या परभणी आगाराची एसटी बस (एम एच २० बी एल ३६१२) क्रमांकांच्या एस टी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने विना नंबर असलेल्या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली.

यामध्ये ऋषिकेश शेळके व ओमप्रकाश राऊत या दोन्ही तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली आहे. जखमी अवस्थेत तरुणांना उपचारासाठी बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या घटनेची माहिती वडवणी पोलिसांना कळताच उपळी बीट अंमलदार नवनाथ ढाकणे यांनी या घटनेकडे तात्काळ धाव घेतली होती. सदरील या घटनेने उपळी गावात शोककळा पसरली आहे. अधिक तपास वडवणी पोलीस करत आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT