Narayan Kuche News 
मराठवाडा

कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आमदार लग्नात डीजेवर नाचले, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) : ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग अशा अवस्थेत भाजपचे बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी कार्यकर्त्याच्या लग्नात डिजेवर नृत्य केले. त्यांचा हा नृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.जालना जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. अशा अवस्थेत सर्वांनी काटेकोरपणे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

मात्र कोरोना प्रतिबंधात्मक नियम ढाब्यावर बसवत मंगळवारी (ता. 16) आमदार नारायण कुचे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव डिजेवर बेभान होऊन नाचले. अर्थात व्हिडिओत अवघे काही सेकंद आमदार नारायण कुचे नृत्य करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र नाचताना त्यांनी मास्क घातलेला नव्हता शिवाय लग्नाची वऱ्हाड असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन देखील त्यांच्याकडून झाल्याचे दिसत नव्हते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर नाचताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा विसर पडल्याची टीका होत आहे. भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील कार्यकर्त्याच्या लग्नाची वऱ्हाड उमरखेड्याला जात होती. तेव्हा तेथून जाताना उत्साही कार्यकर्त्यांनी आमदार कुचे यांचे वाहन थांबवले. तसेच त्यांना नृत्य करण्याचा आग्रह केला. तेव्हा आमदार कुचे वाहनातून खाली उतरून वऱ्हाडी मंडळींसोबत नृत्य केले होते.


लोणगाव येथील कार्यकर्त्याच्या लग्नाची वऱ्हाड वाजत-गाजत उमरखेड्याकडे जात होती. तेव्हा माझी जीप थांबवून कार्यकर्त्यांनी मला नृत्य करण्याचा आग्रह केला. सुरवातीला मी त्यांना नाहीच सांगितले. मात्र आम्हाला कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळावी लागते म्हणून अवघा अर्धा मिनिट नृत्य केले. अर्थात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सर्वांनी काटेकोरपणे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करतो.
- नारायण कुचे, आमदार, बदनापूर - अंबड,

 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Crisis : नाशिक विभागात २८२ टँकरवर सहा लाख नागरिकांची भिस्त; अर्धा जुलै संपला, तरी तहान कायम

MLA Orders Probe: उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर आमदार प्रवीण स्वामींचा धडक आढावा, रुग्णसेवेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण मध्ये दाखल

Audul voter verification drive : आडूळ केंद्रात मतदार पडताळणीला वेग : १०,८०९ पैकी ३,०५४ फॉर्म ऑनलाइन, २९ जुलैपर्यंत सर्वांनी फॉर्म भरण्याचे आवाहन

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात इंधनटंचाई चालणार नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; पेट्रोल-डिझेल, गॅसपुरवठ्याचा ठोस आराखडा सादर करा

SCROLL FOR NEXT