file photo 
मराठवाडा

Video: वैद्यकीय प्रवेशाचा ७०-३० फार्म्युला रद्द करा; संभाजी सेनेचे धरणे

कैलास चव्हाण

परभणी : वैद्यकीय शिक्षण विभागाकडून भरल्या जाणाऱ्या एमबीबीएसच्या जागांसाठी ७०-३० ही प्रवेश अट रद्द करुन मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबविण्याच्या मागणीसाठी परभणीत सोमवारी (ता.१७) संभाजी सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

मराठवाड्यात वैद्यकीय महाविद्यालय पाच आणि जागा ८०० तर विदर्भात ८ महाविद्यालय आणि जागा १ हजार ४०० तर उर्वरीत महाराष्ट्रात २६ महाविद्यालय व ३ हजार ९५० जागा आहेत. मराठवाड्यातील महाविद्यालयांची संख्या कमी असल्याने नीटच्या परीक्षेत मागील वर्षी ५३३ गुण घेणारा परभणीचा विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचीत राहीला आणि केवळ ३९९ गुण घेणारा विदर्भातील विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरला. मराठवाड्यातील ५०० गुण घेणारा विद्यार्थी खासगी महाविद्यालयात आणि विदर्भातील ३६३ गुण घेणारा विद्यार्थी लागला. 

गुणवत्ता असतानाही प्रवेशापासून वंचित 
अखंड महाराष्ट्रात एकच निट परिक्षा घेतली जात असताना मराठावाड्यातील विद्यार्थ्यांना गुणदेखील जास्तीचे असतानाही केवळ मराठवाड्यात प्रवेश असल्याच्या कारणाने वैद्यकीय प्रवेशापासून वंचीत ठेवले जात आहे. मागील अनेक वर्षापासून दरवर्षी मराठवाड्यातील हजारो विद्यार्थी गुणवत्ता असतानाही वैद्यकीय प्रवेशापासून वंचीत राहत आहेत. त्यामुळे जाचक ठरणारा ७०-३० च्या विरोधात आंदोलन सुरु केले जात आहे. हा फार्म्युला रद्द करुन वैद्यकीय प्रवेश परीक्षेची निवड यादी ही गुणांनुसार संपूर्ण राज्यात एकच लावण्यात यावी यामागणीसाठी सोमवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, शहराध्यक्ष अरुण पवार, ज्येष्ठनेते सुभाष जावळे, जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास जोगदंड, सोनाली देशमुख, डॉ. मारोती हुलसुरे,सुधाकर सोनवने, सतीश जाधव, विजय जाधव, रवि तांबे, केशव कदम, शशिकांत माने, रामेश्वर शिंदे, सखाराम काळे आदींनी सहभाग घेतला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT