Latur News 
मराठवाडा

अरे व्वा भन्नाट! लातूरला होणार चिकन महोत्सव

सुशांत सांगवे

लातूर : चिकन किंवा अंड्यांसंदर्भांत पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन करून पोल्ट्री व्यावसायिक डॉ. विजय जाधव म्हणाले, चिकन किंवा अंडी खाल्ल्यामुळे कोरोना होत नाही, हे आता नागरिकांना समजू लागले आहे. त्यामुळे बाजारातील चित्र बदलू लागले आहे.

यासंदर्भात अधिक जनजागृती व्हावी म्हणून पोल्ट्री व्यावसायिक संघटना व चिकन विक्रेता संघटनेच्या वतीने लातूरात चिकन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव येत्या मंगळवारी (ता. ३) शहरातील बार्शी रस्त्यावरील गरड गार्डनमध्ये सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत होणार आहे.

या महोत्सवात महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने सहभागी होणार आहेत. नागरिकांना अत्यंत अल्प दरात या महोत्सवात मांसाहरी पदार्थाचा आस्वाद घेता येईल. 

व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरवात

चिकन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होत असल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचल्याने या व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे.

चिकनबरोबरच गेल्या काही दिवसांपासून अंडी खरेदीसुद्धा मंदावली आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यांत साडेपाच ते सहा कोटी रुपयांचा तोटा शहर आणि जिल्ह्यातील व्यावसायिकांना बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Navin Statement : भाजप राष्ट्रीय अध्यक्षांचे नाक असलेल्या मतदारसंघातील पराभवानंतर नितीन नवीन यांची पहिलीच प्रतिक्रिया, 'निकालाचे गंभीर आत्मपरीक्षण करू'

Bombay High Court: ‘एफडीए’ला उच्च न्यायालयाचा पुन्हा दणका; नवी मुंबईतील रेस्टॉरंटच्या परवाना निलंबनाचे आदेश रद्द, बार मालकाला दिलासा

Maharashtra Rain Forecast : पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; राज्यातील इतर जिल्ह्यांत आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Farmer Loan Waiver 2026: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यासाठी ७ हजार कोटींचा निधी मंजूर, ९४ हजार शेतकरी अपात्र

जीवनमान-जीवनभान : मधुमेह : औषधांसोबत व्यायामाची साथ

SCROLL FOR NEXT