esakal | नांदेड जिल्ह्यात पुन्हा एका बालिकेवर अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आरोपीविरुद्ध अत्याचार व पोक्सोअंतर्गत सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नराधम आरोपीच्या मुसक्या लवकरच आवळल्या जातील अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात पुन्हा एका बालिकेवर अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आणखी एक घटना लोहा तालुक्यातील सोनखेड येथे बुधवारी (ता. २६) सकाळी उघडकीस आली. एका पाच वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिला गावशेजारी असलेल्या नाल्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

पीडीत बालिकेला नग्नावस्थेत सोडून हा नराधम रात्रीच फरार झाला. आरोपीविरुद्ध अत्याचार व पोक्सोअंतर्गत सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नराधम आरोपीच्या मुसक्या लवकरच आवळल्या जातील अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली.

लोहा तालुक्यातील सोनखेड येथील घटना

लोहा तालुक्यातील सोनखेड येथील एका पाच वर्षीय चिमुकली ही आपल्या अंगणात मंगळवारी (ता. २५) खेळत होती. यावेळी तिथे येऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला खाऊचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. आपली बालिका कुठे गेली याचा शोध नातेवाईकांनी सर्वत्र घेतला. परंतु ती सापडली नाही. याप्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात अज्ञातविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हेही वाचादुर्दैवी घटना : आईचे सरण पेटताच मुलीचा मृत्यू

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली भेट

बुधवारी नातेवाईक गाव परिसरातील नाले, ओढे विहीर आदी ठिकाणी तिचा शोध घेत असता ती एका नाल्यात बेशुध्दावस्थेत सापडली. लगेच सोनखेड पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत तिला नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. चिमुकलीला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले मात्र तिच्यावर अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरीक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी सोनखेड गाठले. या घटनेच्या निषेधार्थ सोनखेड कडकडीत बंद पाळण्यात आला. 

अपहरण करणारा तो अज्ञात आरोपी कोण​

चिमुकलीचं अपहरण करणारा तो अज्ञात आरोपी कोण याची माहिती पोलीस काढत असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले. पीडित चिमुकलीवर सध्या नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. दरम्यान या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याच्या मुसक्या तात्काळ आवळा अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

loading image