esakal | उस्मानाबादेतील आणखी ६२,२५७ शेतकऱ्यांना कर्जमाफी
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली व दुसरी यादी जाहीर झाली असून, पुढील लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच यादीमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन आधार प्रमाणीकरण सुरू आहे.

उस्मानाबादेतील आणखी ६२,२५७ शेतकऱ्यांना कर्जमाफी

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६१ हजार २५७ शेतकऱ्यांचा दुसऱ्या यादीमध्ये समावेश असल्याची माहिती सहकार विभागकडून देण्यात आली आहे.

तालुकानिहाय माहिती घेण्याचे काम सध्या सुरू असून, कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला हे कळणार आहे. पहिली यादी २१ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये दोन गावांतील ३१२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला होता. या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत असल्याचे चित्र आहे.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरवात झाली आहे. २१ फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील दोन गावांतील ३१२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. मात्र, शुक्रवारी (ता. २८) प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. रात्री उशिरा लाभार्थींची आकडेवारी काढण्यात आली आहे; तसेच अजूनही तालुकानिहाय माहिती घेण्यात येत आहे.

हेही वाचा - आमदारांच्या सासऱ्याचे उपोषण अन तलाठ्यांचे निलंबन....काय आहे प्रकरण?

लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली व दुसरी यादी जाहीर झाली असून, पुढील लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच यादीमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन आधार प्रमाणीकरण सुरू असून जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सामुदायिक सुविधा केंद्र व बँकांच्या शाखा या ठिकाणी आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर योजनेअंतर्गत लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येणार आहे. याद्या गावनिहाय येत असल्याने थेट आपल्या गावातील किती लोकांना त्याचा लाभ मिळाला हे त्यामध्ये पाहायला मिळत आहे. शिवाय त्यापुढे किती रुपयांची कर्जमाफी व कोणत्या बँकेचे कर्ज होते, हेही पाहता येणार आहे. 

महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या कर्जमाफीचा निर्णय अत्यंत चांगला असून, त्याचा प्रत्यक्ष लाभ आज मिळाला आहे. एक लाख ९३ हजार रुपयांच्या कर्जाचा भार डोक्यावर होता. ते कर्ज सरकारच्या योजनेच्या माध्यमातून फिटल्याचे समाधान आहे. महाविकास आघाडी सरकारने ही कर्जमाफी देताना शेतकऱ्यांचा सन्मान देखील ठेवला आहे. कुठेही अर्ज नाही, रांगेत उभे राहून याचना करायची आवश्यकता यावेळी पडली नाही. 
- सूरज घोगरे, लाभार्थी, राजुरी 

loading image
go to top