Amit Deshmukh News, Coronavirus Latur
Amit Deshmukh News, Coronavirus Latur  
मराठवाडा

'कोरोना'ला थोपवण्यासाठी सूचनांचे पालन करा, मंत्री देशमुखांचे नागरिकांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

लातूर : कोणत्याही परिस्थितीत लातूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. जनतेने घाबरून न जाता दक्षता घ्यावी. शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात संशयित रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी करण्यात यावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी (ता.२२) दिल्या.


विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत ११ मार्चपासून परदेशाहून येणारे प्रवासी,  मुंबई आणि पुणे त्याचप्रमाणे अन्य ठिकाणाहून  येणारे नागरिक आणि कोरोनाची लक्षणे  दिसणाऱ्या रुग्णांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. लातूरातील ३२ रुग्णांचे तपासणीतील नुमने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यापैकी २८ रुग्णांचे नमुने नकारात्मक (निगेटिव्ह) आले असून शनिवारी (ता. २१) पाठवण्यात आलेल्या चार नमुन्यांचा अहवाल रविवारी रात्रीपर्यंत येणे अपेक्षित आहे. या ३२ जणांपैकी सातजण पुण्यातील एका कोरोना सकारात्मक (पॉझिटिव्ह) रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत.

मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे १४ दिवस  विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चार रुग्ण मुंबईतून लातूर जिल्ह्यात आले होते. या रुग्णांचा सकारात्मक रुग्णाशी  संपर्क आल्याचे लक्षात आल्याने  त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, या चारही जणांचा अहवाल नकात्मक आला आहे. या रुग्णांचेही त्यांच्या घरी १४ दिवसांसाठी विलगीकरण करण्यात आले आहे.    
पुणे येथे तपासणीसाठी पाठवलेल्या रुग्णांपैकी दोन जण ४ मार्चला दुबई येथून प्रवास करून आले होते. या रुग्णांना विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेतील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांचे अहवाल आल्यानंतरच त्यांना सोडण्यात येईल. लातूर जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या कोरोना विषयक तपासणीच्या कामकाजाचा दररोज आढावा घेतला जात आहे. तपासणी यंत्रणेत कोणतीही कमतरता राहू नये, याचीही दक्षता घेतली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत लातूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT