corona sakal
मराठवाडा

Osmanabad : उमरग्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयाला कोरोनाची बाधा!

तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग; नागरिकांच्या कामाचा होतोय खोळंबा !

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोना संसर्गाची बाधा सामान्य कुटुंबापासुन ते उच्चभ्रू लोकांच्या घरात पोहोचली आहे. आता तर शासकिय, निमशासकिय कार्यालयाला कोरोनाच्या संसर्गाने वेढले आहे. तहसीलदार राहुल पाटील, गटविकास अधिकारी कुलदिप कांबळे यांना कोरोना  संसर्ग झाल्याने दोघेही क्वारंटाईन झाले आहेत. उमरगा शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग (Corona) वाढत असल्याने नागरिकांमध्ये जेवढी भिती असते. तेवढाच बेफिकिरपणाही दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात संसर्गाला सुरूवात झाली आणि आता जवळपास पाचशेच्या घरात रुग्णसंख्या झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी संसर्ग वाढतो, याची भिती असतानाही लोक लग्नसमारंभ, अंत्यसंस्काराला गर्दी करीत आहेत. प्रशासनाकडून वारंवार दिलेल्या सूचनांचे पालन केले जात नाही.(Corona Virus Spread In Governmental, Semi Governmental Officers In Umarga of Osmanabad)

शासकिय कार्यालय प्रमुखच क्वारंटाईन !

गटशिक्षण अधिकारी शिवकुमार बिराजदार यांच्या पाठोपाठ गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे यांना संसर्ग झाला. पंचायत समितीतील बारा कर्मचारी बाधित झाले. उमरगा (Umarga) पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक तुळशीदास वराडे यांना संसर्ग झाल्याने खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तहसीलदार राहुल पाटील यांना रविवारी (ता.२४) कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. शासकिय, निमशासकिय कार्यालयातील प्रमुख अधिकारी क्वारंटाईन झाल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना संबंधित कार्यालयात कामाचे स्वरूप पाहुनच प्रवेश दिला जातोय. नागरिकांनीही आता काळजी घेण्याची वेळ आली आहे. दरम्यान तहसीलदार पाटील यांनी नागरिकांनी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे आवाहन केले आहे. (Osmanabad)

तहसील कार्यालयाशी संबंधित कामासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेशद्वारावर चौकशी करुन प्रवेश दिला जात आहे. नागरिकांच्या कामाच्या निपटारा करण्याचे काम सुरू आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असतील त्यांना चाचणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- शिवाजी कदम, नायब तहसीलदार (महसूल)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT