3Corona_102
3Corona_102 
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात ११४ जणांना कोरोनाची लागण, सात रुग्णांचा मृत्यू

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये सोमवारी (ता.२१) ११४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून सात जणांचा बळी गेला आहे. त्यातही १५९ रुग्ण दिवसभरामध्ये बरे होऊन घरी गेल्याची दिलासादायक बाब आहे. सात जणांच्या मृत्युने २.९५ टक्के इतका मृत्युदर वाढल्याचे चित्र आहे. वाशी तालुक्यातील पारगाव ८७ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. उस्मानाबाद तालुक्यातील येडशी ५६ वर्षीय स्त्रीचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

सांगावी पोस्ट कामेगाव येथील ६३ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला आहे. उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील ७० वर्षीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. कळंब तालुक्यातील कोलेगाव ४३ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. कळंब तालुक्यातील बाभळगाव येथील ७० वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. कळंब तालुक्यातील मोहा येथील ७६ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला.


जिल्ह्यामध्ये ११४ रुग्णामध्ये ४१ आरटीपीसीआरद्वारे तर ६३ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दहा जणांना इतर जिल्ह्यामध्ये कोरोनाची लागण झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील २२ जण बाधित झाले असून सहा जण आरटीपीसीआरद्वारे व बारा जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असुन चार जणांना इतर जिल्ह्यात लागण झाली. तुळजापुर तालुक्यामध्ये २५ जण बाधित झाले असुन १५ रुग्ण आरटीपीसीआरद्वारे व नऊ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उमरगा तालुक्यातील १७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

आठ जण आरटीपीसीआरद्वारे व नऊ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कळंब तालुक्यातील २६ जण बाधित झाले असुन त्यामध्ये २५ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, तर एक जण परजिल्ह्यामध्ये बाधित झाला आहे. परंड्यामध्ये पाच, लोहारा तीन, भुम दहा व वाशी सहा अशी तालुकानिहाय रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

तुळजापूर तालुक्यातील पांगरधरवाडी गावाचा संपर्क तुटला, पहाटेपासून जोरदार पाऊस

उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या- १०३२५
बरे झालेले रुग्ण- ७३२५
उपचाराखालील रुग्ण- २७६०
एकुण मृत्यु - ३०७
आजचे बाधित - ११४
आजचे मृत्यु - ०७


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT