Exams.jpg
Exams.jpg 
मराठवाडा

बीडमध्ये चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिज्ञासा कसोटी

सकाळवृत्तसेवा

बीड : पाचवी व आठवी इयत्तेसाठी राज्यस्तरावर शिष्यवृत्ती परिक्षा होते. या परिक्षेची पुर्वतयारी म्हणून यापुढे जिल्ह्यात चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर जिज्ञासा कसोटी परीक्षा होणार असल्याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी शनिवारी (ता. २०) गेवराई येथे आयोजित शिक्षण परिषदेत दिली. शिक्षकांसाठीही २७ ऑक्टोबरला केंद्र स्तरावर प्रदर्शन भरणार आहे. 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी धन्वंतकुमार माळी, शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड, विस्तार अधिकारी श्री. काळम यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधत दोन उपक्रमांची घोषणा केली. २७ ऑक्टोबरला प्रत्येक शिक्षकाने एक शैक्षणिक साहित्य बनवून केंद्र स्तरावर प्रदर्शन ठेवावे असे येडगे यांनी सांगितले. यानंतर तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय प्रदर्शन होणार आहे. प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांना प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. जिल्ह्यात जिज्ञासा कसोटीमुळे जिल्ह्यातील १७०० शाळांतील चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची पुर्वतयारीचा फायदा होणार आहे. परिक्षेत आजूबाजूचा परिसर व सामान्य ज्ञान यावर आधारित प्रश्न असतील. त्याच्या प्रश्नपत्रिका जिल्हास्तरावरुन पुरविल्या जातील. ही परिक्षा फेब्रुवारी महिन्यात केंद्र स्तरावर होणार आहे. 

दोन्ही उपक्रम राबविणारा एकमेव जिल्हा
दरम्यान, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी जिज्ञासा कसोटी परिक्षा व शिक्षकांसाठी केंद्र स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत प्रदर्शन आयोजित करण्याचा उपक्रम राबविणारी बीड जिल्हा परिषद राज्यातील एकमेव असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

SCROLL FOR NEXT