vinayak mete 
मराठवाडा

महाविकास आघाडीच्या नेत्यांचे शेतकरीप्रेम पुतणा मावशीचे - मेटे 

सकाळ वृत्तसेवा

बीड - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे शेतकऱ्यांवरील प्रेम हे पुतणा मावशीचे असल्याचे उघड झाल्याचा टोला शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी लगावला. 

इकडे राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार होत असतानाच विनायक मेटे यांनी सरकारवर चौफेर टोलेबाजी केली. परिसरातील वानगाव फाटा येथील साई कोटेक्‍स या जिनिंगवर सोमवारी (ता. 30) शासकीय कापूस खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी श्री. मेटे बोलत होते. नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज उपस्थित होते.

मेटे म्हणाले, की अतिवृष्टीनंतर राज्यात फिरणारे उद्धव ठाकरे हेक्‍टरी 25 हजार रुपयांची मदत देऊ म्हणत होते. त्यांच्यासह कॉंग्रेस - राष्ट्रवादीचे नेते प्रचारात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे शेतकऱ्यांना आश्‍वासने देत होते. आता खुद्द ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर फसवी कर्जमाफी केली आहे. 25 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईचे काय झाले, असा सवालही मेटे यांनी केला.

श्री. मेटे म्हणाले, मागच्या वेळी महायुतीत असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करु, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, असे पाच वर्षे म्हणत राहीले. प्रचारात देखील त्यांचा हाच प्रमुख मुद्दा होता. राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे पक्ष आणि त्यांचे नेते देखील बारमाही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार अशीच आश्वासने देत होते.

आता तिघांची महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर या नेत्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणारी कर्जमाफी केल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला. या सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असेही श्री. मेटे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT