भाकरीचे पीठ संपले अन्‌ सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 डिसेंबर 2019

भाकरी करताना पीठ संपले म्हणून समोरच्या घरात पीठ आणण्यासाठी सुरेखा पालवे गेल्या. मात्र, अज्ञानत वाहनाच्या धडकेत त्या ठार झाल्या. बीड जिल्ह्यातील सिरसमार्ग (ता. गेवराई) फाट्यावर ही घटना घडली. 

बीड - घरात भाकरी करत असताना पीठ संपले. घरात जेवताना कुणाला भाकरी कमी पडू नयेत म्हणून समोरच्या घरातून पीठ आणण्यासाठी निघालेल्या महिलेस वाहनाने धडक दिली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (ता. 28) बीड जिल्ह्यात घडली. सुरेखा मोतीराम पालवे (वय 38, रा. सावरगाव, ता. गेवराई) असे या महिलेचे नाव आहे. 

सुरेखा पालवे गावापासून काही अंतरावर असलेल्या सिरसमार्ग फाट्याजवळ वस्तीवर राहतात. शनिवारी सकाळी त्या भाकरी करीत असताना पीठ संपले म्हणून घरासमोरच रस्त्याच्या पलीकडे असलेल्या घरातून पीठ आणण्यासाठी निघाल्या.

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...

रस्ता ओलांडताना भरधाव आलेल्या वाहनाने सुरेखा यांना जोराची धडक दिली. यात सुरेखा यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागून त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. 

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

आवाज कशाचा झाला म्हणून शेजारीच राहणारा त्यांचा पुतण्या आणि इतर काही जण घराबाहेर धावत आलेय तोपर्यंत धडक देणारे वाहन निघून गेलेले होते. सुरेखा यांना उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात आणताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surekha's life is broken.

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: