...आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

परळी वैजनाथ (जि. बीड) : येथील पंचायत समितीच्या सभापतीची निवड सोमवारी (ता. 30) होणार असून आमदार धनंजय मुंडे यासंदर्भातील निर्णय घेणार आहेत. पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसीसाठी राखीव आहे. ओबीसी गटातील अनेक जण सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. सभापतीपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, हे आज ठरणार आहे. 

परळी वैजनाथ (जि. बीड) : येथील पंचायत समितीच्या सभापतीची निवड सोमवारी (ता. 30) होणार असून आमदार धनंजय मुंडे यासंदर्भातील निर्णय घेणार आहेत. पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसीसाठी राखीव आहे. ओबीसी गटातील अनेक जण सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. सभापतीपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, हे आज ठरणार आहे. 

सभापतीपदासाठीची आरक्षण सोडत 16 डिसेंबरला काढण्यात आली. यामध्ये सभापतीपद ओबीसीसाठी राखीव सुटले आहे. पंचायत समितीवर आमदार धनंजय मुंडे यांची एकहाती सत्ता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 12 पैकी नऊ सदस्य निवडून आले आहेत. याअगोदर पंचायत समितीच्या सभापतीपदी कल्पना मोहन सोळंके व उपसभापतीपदी बालाजी मुंडे यांची निवड झाली होती.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

या वेळी आरक्षण सोडतीत ओबीसीसाठी सभापतीपद सुटल्याने बालाजी मुंडेंसह ऊर्मिला शशिकांत गित्ते, मीरा वसंत तिडके, रेणुका भास्कर फड, सुषमा ज्ञानोबा मुंडे यांच्यापैकी आमदार मुंडे कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, यावर अवलंबून आहे. धनंजय मुंडे यांच्या ताब्यात नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती आहे.

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

तालुक्‍यातील जातीय समीकरणे जुळवताना त्यांनी उपनगराध्यक्षपदी मुस्लिम समाजाचे शकील कुरेशी यांची नुकतीच निवड केली आहे. मागच्या वेळी मराठा समाजाला पंचायत समितीचे सभापतीपद, तर वंजारी समाजाला उपसभापतीपद दिले होते.

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...

बाजार समितीच्या सभापतीपदी वंजारी समाजाच्या पदाधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. आता पंचायत समिती व काही दिवसांनी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड आहे. यामध्ये श्री. मुंडे कोणत्या पद्धतीने हे सर्व साध्य करतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parli Panchayat Samiti Elections Beed News