Dhananjay-Munde
Dhananjay-Munde 
मराठवाडा

गल्ली ते दिल्ली सत्ता असतानाही गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न अपूर्ण!

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजीनाथ : जायकवाडीचे माजलगाव धरणात येणारे पाणी वाण धरणात आणण्याचे आणि परळीत पंचतारांकित वसाहत उभारण्याचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न होते. गल्ली ते दिल्ली सत्ता असताना त्यांचेही स्वप्न पूर्ण करता आले नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी परळीत पोचली.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार सतिष चव्हाण, आमदार विक्रम काळे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, राजेंद्र जगताप, संदीप क्षीरसागर, सरोजिनी हालगे उपस्थित होते. यात्रेचे दुचाकी फेरीने यात्रेचे स्वागत करण्यात आले.

यानंतर झालेल्या सभेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री असताना परळीत पंचतारांकित वसाहत उभारण्यासाठी दिवंगत मुंडेंनी प्रयत्न केले. मात्र, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे त्यावेळी ते शक्य झाले नाही. परंतु, सिरसाळात २२०० एकर जमीन उपलब्ध असल्याचे पत्र आपण उद्योगमंत्र्यांना दिले. त्यानंतर अधिकारी पाहणीसाठी आल्यानंतर आमच्या ताईंना लक्षात आल्याचा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. त्यांचे अनेक उद्योगपतींशी ओळखी आहेत. मग, परळीत एकही व्यवसाय का आणला नाही? असा सवालही त्यांनी केला.

आपण सत्तेत नसताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामुळे इथे सिमेंट आणि सोलार उद्योग आणला. आशिया खंडात नावलौकिक असलेला वैद्यनाथ कारखाना रसातळाला गेला. शेतकऱ्यांना अद्याप एफआरपीचे पैसे भेटले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. आपला जर कारखाना असता तर होते नव्हते ते विकून शेतकऱ्यांचे पैसे दिले असते, असेही धनंजय मुंडे म्हणाले. आपले वैयक्तीक भांडण नसून लोकांच्या हितासाठी असल्याचेही ते म्हणाले.

परळीकरांच्या प्रत्येक अडचणीत आपण धाऊन जातो, मग माझ्यात कमी काय, असे भावनिक आवाहन करत ही निवडणूक माझ्या जीवन मरणाची असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

SCROLL FOR NEXT