मराठवाडा

ऊसतोड मजूराला ठार मारण्याचा प्रयत्न

सकाळवृत्तसेवा

नांदेड : ऊसतोड मजूरांकडे राहिलेले पैसे परत घेण्यासाठी चक्क मुखेड तालुक्यातील पांडूर्णी येथील एका मजूराचे अपहरण करून त्याला डांबून ठेवले. एवढेच नाही तर त्याला किटकनाशक पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोलापूरच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुखेड तालुक्यातील पांडूर्णी येथील काही कामगारांना सोलापूर जिल्ह्यातील कामठी तांडा येथील ऊसतोड मुकदमाने कारखान्यावर नेले होते. परंतु, उचल घेऊन घरगुती अडचण आल्याने हनमंत एकनाथराव लोहबंदे (वय 30) हे कामावर गेले नाही. त्यांच्याकडे एक लाख 73 हजार रुपये होते. या पैशाची परतफेड करण्यास मुकदमाने अनेकवेळा पाठपुरावा केला. परंतु, त्यांना हनमंत लोहबंदे हे कधी भेटत असत तर कधी पैसे नसल्याचे कारण पुढे करून वेळ घालवून नेत असे. अखेर कामठी तांडा ता. जि. सोलापूर येथील प्रविण राठोड, सचीन राठोड आणि रामा राठोड हे तिघेजण 10 ऑक्टोबर रोजी पांडूर्णी येथे एका बोलेरो गाडीतून आले.

त्यांनी हणमंत लोहबंदे यांचे मुखेड येथून अपहरण करून सोलापूरला नेले. तिथे त्याला डांबून ठेवले. मारहाम केली एवढेच नाही तर किटकनाशक पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क असलेल्या लोहबंदे यांनी सुटका करून घेत मुखेड गाठले. हनमंत लोहबंदे यांच्या फिर्यादीवरुन मुखेड ठाण्यात वरील तिघांवर अपरहरण, ठार मारण्याचा प्रयत्न यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सांगळे हे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

SCROLL FOR NEXT