banduk
banduk 
मराठवाडा

अबब..! हीच का ती बंदूक? 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : "आतापर्यंत फक्त चित्रपटांत पाहिली होती; पण पोलिसांकडील बंदूक नुसती बघितलीच नाही तर ती हाताळलीही. "बंदूक अशी असते होय...'' असे उद्‌गार होते आयुक्तालयात आयोजित शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहणाऱ्या बालगोपाळांचे. पोलिस स्थापना दिवसानिमित्त दोन ते सहा जानेवारीदरम्यान पोलिस विभागातील विविध शाखांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्यात शालेय मुलांसह अनेकांनी प्रदर्शनाला भेट दिली. 

नागरिक-पोलिस समन्वय साधण्यासाठी पोलिस स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलिस विभाग, त्यांची कार्यपद्धती आणि विविध शस्त्रे, वाहनांचे प्रदर्शन भरविते. आयुक्तालयात सहा जानेवारीपर्यंत प्रदर्शन असून, यात शुक्रवारी (ता. 4) दिवसभरात दहा ते बारा शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अनेकांनी शस्त्रे हाताळून पाहिली. बंदूक कशी चालवितात, किती बोअरची आहे, काडतूस कशी असतात, यासह विविध बाबी प्रदर्शनातून विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांनीही जाणून घेतल्या. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते शुक्रवारी प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. 

शहारे आणणारा डेमो.. 
आणीबाणीच्या काळात तसेच दहशतवादी हल्ला झाल्यास क्‍यूआरटी पथकाचे काम काय असते, ते लक्ष्य कसे साधतात, घटनास्थळी जागा कशी घेतात, हल्लेखोरांना कसे पकडतात, याचे प्रात्यक्षिक आयुक्तालयातील देवगिरी मैदानावर करण्यात आले. हा डेमो अंगावर शहारे आणणारा होता. सुमारे वीस मिनिटे हल्लेखोर आणि जवानांत धुमश्‍चक्री पाहून विद्यार्थीही भयचकित झाले.

प्रदर्शनात काय पाहाल? 
एसआरपीएफ, आरमार शाखा, गुन्हेशाखा, आर्थिक गुन्हेशाखा, सायबर, महिला तक्रार निवारण, बिनतारी संदेश विभाग, नागरिक संरक्षण विभाग, पोलिस कल्याण विभाग, बॉंबशोधक व नाशक पथक, श्‍वान पथक, पोलिसांची आणीबाणीतील वाहने, क्‍यूआरटी पथक, महिला व बालसाहाय्य पथक आदींचा प्रदर्शनात सहभाग असून कार्यपद्धतीही जाणून घेता येणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT