Udgir Crime News
Udgir Crime News  
मराठवाडा

सोनसाखळी चोर व पोलीसात सीनेस्टाईल हाणामारी

युवराज धोतरे

उदगीर : शहरालगत असलेल्या एसटी कॉलनीत बुधवारी (ता.22) सकाळी सहाच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसाला संशय आल्याने चोरट्याची मोटारसायकल अडवून विचारपूस करत असताना चोरट्याने पोलिसावर हल्ला केला. या दोघांत सिनेस्टाईल हाणामारी चालू झाली. चोरटा मोटरसायकल टाकून काट्याच्या जाळीत उडी मारून पसार झाला.


गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सध्या मकर संक्रांती, हळदी-कुंकूवाचा सण असल्याने महिलांची रस्त्यावरून गर्दी आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या चैन सोनसाखळी चोरीच्या तपासात चोराच्या वर्णनावरून व गाडीच्या प्रकारावरून ग्रामीण पोलिसांनी एसटी कॉलनी, उदयनगर, शेळकी रस्ता, मादलापुर रोड, निडेबन परिसर येथे पहाटेपासून साध्या कपड्यावरील एक पोलीस नेमून तपास सुरू केला होता.


एसटी कॉलनीत बुधवारी पहाटे गस्तीवर असलेले पोलीस शिपाई तुळशीराम बरूरे यांना तोंडाला बांधुन असलेल्या व संशयित गाडी दिसल्याने समोर असलेल्या एका मोटर सायकलला आपली मोटरसायकल आडवी लावून उतरून त्याची चौकशी करत असतानाच त्या चोरट्यांनी मोटरसायकल सोडून दगड हातात घेऊन पोलिसावर धाऊन गेला. पोलिसांनी त्याच्या मुसक्‍या आवळण्यासाठी त्यास धरले असता दोघांत सिने स्टाईलने हाणामारी झाली. शिवनगर कॉर्नरपासून त्याने उड्डाणपुलाकडे पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला त्याने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसाच्या पायाच्या अंगठ्यावर दगड लागला. पोलिसांनी त्याच्या पाठीत दगड घातला मात्र त्याला न जुमानता तो काट्याच्या जाळीत उडी मारून पसार झाला.


याची माहिती ग्रामीण पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ यांना त्यांनी दिल्यानंतर तत्काळ पोलीस निरीक्षक तेथे दाखल झाले. पोलीस पथकाने बॅटरीच्या उजेडात त्याचा शोध केला पण तो सापडला नाही. त्यानंतर शहरातील रेल्वे स्थानक, बीदरकडे जाणारी वाहने, लातूर कडे जाणाऱ्या वाहनात कसून चौकशी करण्यात आली.मात्र त्याचा सुगावा लागला नाही.

मोटारसायकल पोलिसांच्या ताब्यात
चोराची मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मोटारसायकल कर्नाटकातील औराद तालुक्‍यातील असल्याचे या मोटरसायकल क्रमांकावरून कळले आहे. त्याने नंबर प्लेट तोडून डिकी मध्ये ठेवले होते.

नागरिकांची अनास्था
ही हाणामारी पाहणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी हा चोर आहे..याला पकडा... असे सांगूनही त्याला पकडले नाही. काही जणांनी आपली घरं बंद करून घेतली. पाटलाग करतानाही नागरिकांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली नाही. त्यामुळे नागरिकांची अनास्था दिसून आली.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT