Marathwada Osamanabad News 
मराठवाडा

उस्मानाबाद : वेतन कपात निर्णयाचा आरोग्य कर्मचाऱ्यांकडून निषेध, दिवसभर केले कामबंद 

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : कोरोना योध्दा ठरलेल्या अधिपारिचरिका आणि परिचारिका यांच्या वेतनामध्ये कपात करण्याचा दुर्देवी निर्णय सरकारने घेतला. यावर नाराज होत कर्मचाऱ्यांनी  सरकारविरोधात निषेध व्यक्त केला आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांनी सोमवारी (ता.आठ) रस्त्यावर येत एक दिवस काम बंद केले. 

अरे बाप रे ! मोरांना विष अन् नीलगायी, रानडुकरांना देतात शॉक ! 
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत देखील आरोग्य कर्मचारी लढाई देत आहेत. आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त कामाचा बोजा असून देखील त्यांच्या पगारीत कपातीचा निर्णय घेतल्याने परिचारिका यांनी निषेध व्यक्त केला.
सात जन्म काय..सात सेंकंद देखील नको बायको आम्हाला |

२०१५ पर्यंतचे जे बंधपत्रित नर्सेस याना विशेष लेखी परीक्षा घेऊन कायम सेवेत समाविष्ट केले. त्या प्रमाणे राहिलेल्या बंधपत्रित नर्सेसची पण विशेष लेखी परीक्षा घेऊन सेवेत घ्यावे. आता मानधन तत्वावर २५ हजार रुपये वेतन आहे. ते रद्द करून पूर्वरत जे वेतन प्रणाली मधून वेतन दिले जात होते ते चालु करावे, पूर्वी जे १८ महिन्याचे बंधपत्र नंतर जे ११ महिन्याचे बंधपत्र दिले जात होते ते देण्यात यावे. सहा महिन्याचे बंधपत्र रद्द करावा आदी मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या आहेत. 

यापूर्वी कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणालीद्वारे वेतन दिले जात होते. परिपत्रकानुसार मानधन तत्वावर २५ हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. साहजिकच यामुळे कर्मचाऱ्यांच्यासमोर आर्थिक अडचणी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिपरीचारक,अधिपरिचारिकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बंधपत्र दिले जात होते. ते या नवीन वर्षापासून जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणार आहेत त्यांना दिले जाणार नाही. 

ज्या लोकांना आता बंधपत्र चालू आहे. त्यांना शासन सेवेत सामावून घेण्याऐवजी त्यांना मानधन तत्वावर ठेवण्यात आले आहे. हा कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय आहे. ज्या काळात शासनाने त्यांच्या सोयीसुविधा वाढविण्याची आवश्यकता असताना अशा काळात त्यांच्यावर अन्यायकारक निर्णय घेतल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

चिमुकला पाण्यात बुडत होता; वाचवण्यासाठी दोघांची नदीत उडी अन्...; महादेव घाटावरील पिकनिकचा आनंद क्षणात शोकांतिकेत

Marathwada Farmers: ऐन हंगामात निसर्गाचा घाला! केळी, डाळिंब, मोसंबी बागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी

Bajaj Best Mileage Bikes : मार्केटमध्ये एक दमदार बाईक! 100 कि.मी. मायलेज अन् 91 हजार किंमत, पेट्रोलचं टेन्शन दूर

TasteAtlas च्या जगातील सर्वोत्तम कोळंबी पदार्थांच्या यादीत 'चिंग्री मलाई करी'; जाणून घ्या या प्रसिद्ध बंगाली पदार्थाचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT