सात जन्म काय..सात सेंकंद देखील नको बायको आम्हाला

प्रताप अवचार
Friday, 5 June 2020

पत्नी पीडित आश्रमात पुरुषांनी केली वटपौर्णिमा साजरी, म्हणे पिंपळ हे मुज्यांचे प्रतीक त्याची पूजा करून आम्हाला बायकोपासून सुटका मिळावी. अशी विनवणी त्यांनी भगवंताकडे आहे. 

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात पत्नी पीडित पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी केली आहे. सात जन्मच काय सात सेकंद देखील आम्हाला बायको नको. असा घोषणा देत वडाच्या नव्हे पिंपळाच्या झाडाला उलट्या 108 प्रदक्षिणा घालत त्यांनी पूजन केले.

 हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  

औरंगाबाद शहरात 2017 पासून पत्नी पीडित संघटना काम करीत आहे. वाळूज परिसरात पत्नी पीडितांच्या निवासासाठी पत्नी पीडित आश्रम सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी राज्यभरातून आतापर्यंत नऊ हजार पत्नी पीडितांनी नोंदणी केली आहे. अनेक पीडित बायकोपासून सुटका व्हावी म्हणून न्यायालयीन लढा देत आहे. मात्र त्यांना न्याय मिळत नसून प्रचंड मानसिक त्रास सहन करावे लागत आहे. त्यासाठी पत्नी पीडित आश्रमाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. घरातून हाकलून दिलेल्या पुरुष या ठिकाणी राहतात. 

हेही वाचा चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ

वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाचे पूजन करून कुटुंबाची आणि पतीच्या सुखाची मागणी करतात. यात जर सत्यता असेल तर आम्ही पत्नी देखील वडाच्या ऐवजी पिंपळाची पूजा करून बायको पासून सुटका मिळावी म्हणून विनवणी करतो. पिंपळ हे (मुंज्या- लग्न न झालेला व्यक्ती) चे प्रतिक मानले जाते. मग आम्ही पिंपळाची 108 उलट्या प्रदक्षिणा घालून पूजा करून बायको पासून सुटका व्हावी अशी विनंवणी करतो.

 
आमच्याकडे नऊ हजार पत्नी पीडित पुरुषांची नोंद आहे. घरातून हाकलून दिलेल्या पुरुषणाची व्यवस्था आम्ही करतो. वाटपौर्णिमेऐवजी आम्ही पिंपळ पौर्णिमा साजरी करून पत्नीं पासून सुटका मिळावी अशी आर्त हाक मारतो. 
भारत फुलारे, संस्थपक अध्यक्ष , 
पत्नी पीडित पुरुष आश्रम. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man celebrate Vatpoornima at wife victim ashram.