
नवजात बालिकेची प्रकृती स्थिर आहे. मुलीचे वजन अडीच किलो आहे. कोविड चाचणीसाठी तिच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असून दुसऱ्या चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे. अशी माहिती घाटीतील डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
औंरगाबाद : गर्भवती असलेल्या 30 वर्षीय महिलेने आई होण्याचे स्वप्न पाहिले. 28 मे रोजी ती प्रसूत झाली, गोड स्वप्नही पूर्ण झाले. गोंडस मुलगीही झाली. पण तिला कोरोची बाधा झाल्याचे प्रसूतीच्या दुसर्याच दिवशी स्पष्ट झाले. जेमतेम आठवडाही न होतो की सात दिवसांची तान्हुली ममस्पर्शाला मुकली कारण तिची आई सातव्या दिवशीच तिला सोडून गेली ती कायमचीच.
जाणून घ्या - नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही...
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील नेहरू नगर, कटकट गेट येथे राहणाऱ्या 30 वर्षीय गर्भवती महिलेला 28 मे रोजी सांयकाळी चारच्या सुमाराड घाटीत भरती करण्यात आले. त्याच दिवशी महिलेची प्रसूती झाली आणि गोंडस मुलगी झाली. त्यानंतर 29 मे रोजी तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. सर्व आनंदात असताना एका चाचणीने विरजण पडले. आईवर घाटीतील कोविड रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. परंतु तिचे मूत्रपिंड निकामी झाल्याने पाच वेळा डायलिसिस करण्यात आले. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने तिला कृत्रिम श्वसन प्रणालीवर ठेवण्यात आले. मात्र तिची प्राणज्योत चार जूनला दुपारी दोनच्या सुमारास मृत्यू मालवली.
हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ
बाळाचा पहिला अहवाल निगेटिव्ह
28 मे रोजी महिलेलने जन्म दिलेल्या मुलीची प्रकृती स्थिर आहे. मुलीचे वजन अडीच किलो आहे. कोविड चाचणीसाठी तिच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असून दुसऱ्या चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे. अशी माहिती घाटातील डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
एकूण 93 मृत्यू -
प्रसूत महिलेच्या मृत्यूने आतापर्यंत घाटीत 72, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 20, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 93 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..
आज 59 रुग्णांची वाढ
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णसंख्या 1 हजार 828 झाली. आतापर्यंत एकूण 1 हजार 126 जण बरे झाले असून 609 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आज आढळलेले 59 रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) - भारतमाता नगर (1), इंदिरानगर न्यू बायजीपुरा (1), न्यू कॉलनी, रोशन गेट (1), भावसिंगपुरा (1), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (1), बेगमपुरा (1), चिश्तिया कॉलनी (1), फाझलपुरा (1), रेहमानिया कॉलनी (1), गांधी नगर (1), युनूस कॉलनी (2), जुना मोंढा, भवानी नगर (1), शुभश्री कॉलनी, एन - सहा (1), संत ज्ञानेश्वर नगर, एन - 9 (1), अयोध्या नगर, एन- सात (7), बुडीलेन (3), मयूर नगर, एन - अकरा (1),विजय नगर, गारखेडा (3), सईदा कॉलनी (1), गणेश कॉलनी (1), एसटी कॉलनी, फाजलपुरा (1), रोशन गेट परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), औरंगपुरा (2), एन - आठ सिडको (1), समता नगर (4), मिल कॉर्नर (2), जवाहर कॉलनी (3), मोगलपुरा (2), जुना मोंढा (1), नॅशनल कॉलनी (1), राम मंदिर, बारी कॉलनी (1), विद्यानिकेतन कॉलनी (1), देवडी बाजार (1), एन- सात सिडको (1), एन - बारा (1), आझाद चौक (1), टी.व्ही. सेंटर एन अकरा (1), कैलास नगर (1), अन्य (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यात 19 महिला आणि 40 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान
कोरोना मीटर