Jalna Nine swords seized
Jalna Nine swords seized sakal
मराठवाडा

जालना : तब्बल नऊ तलवारी जप्त

सकाळ वृत्तसेवा

जालना : शहरात शस्त्र बाळगणाऱ्या संशयित आरोपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही महिन्यांपूर्वीच धुळे पोलिसांनी जालन्यात येणारा तलवारींचा मोठा साठा जप्त केला होता. त्यानंतर शहरात पोलिसांनी छापासत्र राबवून काही तलवारी जप्त केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा जालना शहरात तब्बल नऊ धारदार तलवारींसह दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री अटक केली.

जालना शहरासह जिल्ह्यात गावठी पिस्तूल, तलवारीचा संशयित आरोपींकडून वापर वाढल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी धुळे पोलिसांनी जालन्यात येणाऱ्या तलवारीचा मोठा साठा जप्त केला होता. विशेष म्हणजे जालना शहरासह जिल्ह्यात तलावारीचा साठा बाहेर ठिकाणावरूनच येतो असे नाही. तर शहरातील काही भागांमध्ये या तलवारी तयार करून विक्री केल्या जात आहेत. अशाच तलवारीचा साठ्यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शुक्रवारी खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील वाल्मीकनगर येथील शेख कलीम शेख रफिक याच्या घराजवळील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.

या शेडमधील एका संदूकमध्ये तब्बल नऊ धारदार तलवारी पोलिसांना मिळून आल्या. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून संदूकसह नऊ तलवारी जप्त केल्या आहेत. शिवाय संशयित आरोपी शेख कलीम शेख रफिक (रा. वाल्मीकनगर, जालना) याला अटक केली असून तलवारीचा साठा पुरविणाऱ्या आफरोज हफीज पठाण (रा. मंगळबाजार, जालना) याला ही स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर एक संशित आरोपी फरार आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, कर्मचारी गोकुळसिंग कायटे, सॅम्युअल कांबळे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, कैलास चेके, योगेशन सहाने, महिला कर्मचारी चंद्रकला शडमल्लू यांनी केली.

जालन्यात तयार झाल्या तलवारी

या प्रकरणातील फरार आरोपी हा शहरातील असून त्याने या तलवारी तयार केल्या आहेत, असे पोलिसकडून सांगण्यात आले. या तलवारी तयार करून विक्रीसाठी साठवणूक करण्यात आली होती. केवळ एक हजार ते दीड हजार रुपयांमध्ये या तलवारींची विक्री केली जाते, असे पोलिस तपासामध्ये पुढे आले आहे. कमी पैशांमध्ये तलवारी उपलब्ध होत असल्याने तलवारी बाळगण्याचे संशयित आरोपींचे फॅड वाढल्याचे चित्र आहे.

पोलिसांसमोर शस्त्राची विक्री रोखण्याचे आव्हान

शहरासह जिल्ह्यात गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसांसह अनेक आरोपींना अटक केली आहे. मात्र, या गावठी पिस्तूल विक्रीच्या मुळापर्यंत पोलिसांचा तपास अद्याप पोचलेला नाही. नवीन पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्यासमोर शहरातील शस्त्रांची होणारी विक्री-खरेदी रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

SCROLL FOR NEXT