Jalna Tembhurni Khadakpurna project
Jalna Tembhurni Khadakpurna project 
मराठवाडा

जालना : खडकपूर्णा प्रकल्प अजूनही तहानलेलाच

संजय राऊत

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील पावसावर अवलंबून असणाऱ्या खडकपूर्णा प्रकल्पात शुक्रवारी सकाळपर्यंत एकूण ३१ टक्के जलसाठा नोंद झालेला आहे. याशिवाय जिवरेखा प्रकल्पातही २१ टक्‍क्यांवर पाणीसाठा आहे. त्यामुळे या भागात जोरदार पावसाची नितांत गरज आहे.

जाफराबाद तालुक्यातील जून ते सप्टेंबर कालावधीतील वार्षिक सरासरी ५७९.६० मिलिमीटर इतकी आहे. जूनपासून आतापर्यंत तालुक्यात ४३८.३० मिलिमीटर पाऊस नोंद झालेला आहे. पावसाची टक्केवारी ७५.६२ इतकी आहे. असे असले तरी पावसाचे स्वरूप रिमझिमच राहिलेले आहे. परिणामी खडकपूर्णा, जिवरेखा प्रकल्पात पाण्याची आवक जेमतेम राहिलेली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत या खडकपूर्णा प्रकल्पात ३१.०५ टक्के जलसाठा पाटंबधारे विभागाने नोंदविलेला आहे. या धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासांत नाममात्र एक मिलिमीटर पाऊस पडला.

अकोलादेवी येथील जीव रेखा धरणामध्ये सद्यःस्थितीत २१.२३ टक्‍क्यांवर जलसाठा आहे. जिवरेखा धरणात सध्या फक्त २.५५ दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे, ही धरणे भरण्यासाठी परिसरात मोठ्या पावसाची गरज आहे याशिवाय तालुक्यात असलेल्या भारज, कोनड, चिंचखेडा या प्रकल्पातही अद्याप मुबलक जलसाठा नाही. त्यामुळे अजून एकही प्रकल्प ओसंडून वाहिलेला नाही. तालुक्यातील धामणा व पूर्णा या नद्याही पूर्ण क्षमतेने अद्यापही दुथडी वाहिलेल्या नाहीत. त्यामुळे या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायमच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT