जळकोट - तालुक्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून नाला खोलीकरण, नाला सरळीकरणाची कामे सुरू आहेत. वांजरवाडा (ता. जळकोट) येथे हे काम सुरू असताना कडाक्याच्या उन्हात मे महिन्यात पाणी लागल्यामुळे ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण आहे.
वांजरवाडा येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे सुरू असून दहा बीटचे काम मंजूर झाले आहे. मागील दहा दिवसांपासून दोन यंत्रांद्वारे हे काम चालू आहे. लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आमदार सुधाकर भालेराव, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, तहसीलदार डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे चालू आहेत.
हे काम करत असताना नाला खोलीकरणात ऐन उन्हाळ्यात गावालगत असलेल्या शिवारात पाणी लागले. त्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. मे महिन्यात पाणी लागल्यामुळे अनेकजण हे पाणी पाहायला येत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.