Leopard News esakal
मराठवाडा

विहिरीत पडला बिबट्या, गावकरी अन् वनविभागामुळे वाचला जीव

गावकरी अन् वनविभागामुळे वाचला जीव

संजय राऊत

टेंभुर्णी (जि.जालना) : जाफराबाद तालुक्यातील काळेगाव कुंभारझरी व विदर्भातील कल्याण जवळ शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचा नजरेस पडलेला बिबट्या गुरुवारी (ता.सात ) सकाळी जालना (Jalna) जिल्हामधील काळेगाव शिवारातील सुखदेव उत्तम बनकर या शेतकऱ्याच्या विहिरीत आढळून आला. शिकारीच्या शोधात रात्री हा बिबट्या (Leopard) पडला असावा असे काळेगाव येथील शेतकरी गजानन चव्हाण यांनी सांगितले. रात्रभर तो पाइपला धरून बसलेला आढळून आला. (Life Of Leopard Save In Jalna By Villagers And Forest Department)

सकाळी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोहून त्रस्त झालेल्या बिबट्याला वाचविण्यासाठी विहिरीमध्ये बाज सोडण्यात आली. या बाजेवर बुलडाणा येथील वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत तो बसून होता. दरम्यान बुलडाणा येथील वनविभागाचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाब्बास ! दुसरा नीरज चोप्रा; आशिष यादवने U20 World Championships मध्ये जिंकलं ऐतिहासिक पदक; शेतकऱ्याच्या लेकाची भरारी

मुंबईत भररस्त्यात बर्थडेचा धिंगाणा! बोनेटवर केक कटिंग अन् एअरगनने गोळीबार, भाजप कार्यकर्त्यासह १० जणांना अटक; Video Viral

Shoumika Mahadik Satej Patil : भावा हे कोल्हापूर! वर्षानुवर्षांचा राजकीय वाद बाजूला; शौमिका महाडिकांनी कुटुंबीयांसोबत सतेज पाटलांचे केले सांत्वन

Bofors Case: ‘बोफोर्स’ प्रकरणाला ४० वर्षांनी पूर्णविराम, सर्वोच्च न्यायालयातील शेवटची याचिकाही निकाली

Delhi High Court: आंदोलनाची जागा का बदलत नाही?; दिल्ली उच्च न्यायालयाची जंतरमंतरविषयी विचारणा

SCROLL FOR NEXT