Heat Waves ! राज्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा

नागरिकांनो काळजी घ्या...
heat waves
heat wavesesakal
Updated on

पुणे : उन्हाळा कडक होत चालला आहे. त्यातही आता उष्णतेच्या लाटा (Heat Waves) वाहण्याची भीती भारतीय हवामान विभागाने (Indian Metrological Department) आज गुरुवारी (ता.सात) व्यक्त केली आहे. जम्मूत ७ ते ८ एप्रिल दरम्यान, ७ ला उत्तर-मध्य महाराष्ट्रात (Maharashtra), ९-११ च्या दरम्यान विदर्भात, गुजरात आणि कच्छच्या उत्तर भागात ७ ते ९ एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटा वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आणखीन तीव्र आणि नियमित उष्णतेच्या लाटा एप्रिलमधील येतील असा अंदाज हवामान विभागाचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी बुधवारी सांगितले. (Heat Waves In April, Indian Metrological Department Prediction)

heat waves
रोहित तू बिनधास्त जा, नितीन गडकरींनी आबांच्या लेकाला दिला शब्द

उत्तर पूर्व आणि मध्य भारतात तापमान वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान विभागाने या पूर्वीच एप्रिल महिना हा मार्चच्या तुलनेत तापमान अधिक असेल असा अंदाज वर्तवला होता, असे मोहपात्रा यांनी सांगितले.

heat waves
हवामान बदलाचा परिणाम फुलपाखरांच्‍या जीवनचक्रावर

उत्तर-मध्य भारत आणि मध्य भारत जसे की गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आदी तापमान सर्वसामान्यापेक्षा अधिक असेल असे एका कार्यक्रमात मोहपात्रा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Golden Glory for India: Satara Athlete Sudeshna Helps Team Clinch Top Honors
Love Affair Ends in Bloodshed: Wife, Lover Accused in Engineer’s Murder Plot
NCP leaders sunetra Pawar and Sunil Tatkare 
Solapur IT Park Project
Marathi News Esakal
www.esakal.com