Sanjay Shirsat, Raju Shinde
Sanjay Shirsat, Raju Shinde 
मराठवाडा

औरंगाबाद पश्चिम : संजय शिरसाट आघाडीवर । Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे संजय शिरसाट तब्बल 25,775 मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत त्यांनी एकूण 56,264 मते घेतली. एमआयएमचे अरुण बोर्डे यांनी 21,472
, वंचितचे संदीप सिरसाट यांनी 14,459 तर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांनी 30, 489 हजार मते घेतली.

अशी आहे औरंगाबाद पश्‍चिम मतदारसंघाची पार्श्‍वभूमी 
2004 मध्ये शहरात दोनच मतदार संघ होते औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्‍चिम. पश्‍चिममध्ये कॉंग्रेस उमेदवाराला 1 लाख 54 हजार 56 मतांनी विजयी झाले होते तर शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांना 1 लाख 46 हजार 170 मते मिळाली होती ते दुसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी 10 उमेदवार मैदानात होते त्यात तीन अपक्ष होते.

2009 च्या निवडणुकीत औरंगाबाद शहराच्या पूर्व आणि पश्‍चिम मतदार संघात मध्य विधानसभा मतदार संघाची भर पडली आणि 2009 मध्ये पश्‍चिम मतदार संघातुन शिवसेनेचे संजय शिरसाट पहिल्यांदा आमदार झाले होते. 2009 मध्ये एकूण 19 उमेदवार मैदानात होते त्यात पहिल्यांदा संजय शिरसाट विजयी झाले होते त्यांना 58 हजार 8 मते मिळाली होती
तर दुसऱ्या क्रमांकावरचे दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेसचे चंद्रभान पारखे होते त्यांना 43 हजार 797 मते मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर भारिपचे अमित भुईगळ होते त्यांना 3 हजार 791 मते मिळाली होती. त्यावेळी तब्बल 11 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते.  2014 मध्ये या मतदार संघात 18 उमेदवार होते.

काॅंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बसप, मनसे, आरपीआय ( के.) सह अन्य पक्षांचे उमेदवार होते तर 6 अपक्ष मैदानात होते. त्यात शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी 61 हजार 282 मतांनी विजयी झाले होते तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे मधुकर सावंत यांना 54 हजार 355 मते मिळाली होती. वैध मतांची संख्या 1 लाख 84 हजार 679 इतकी होती तर नोटाचे प्रमाण 1 हजार 131 इतके होते . 1995 मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे 1 लाख 26 हजार 700 मते मिळवून आमदार झाले होते. 1990 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पहिल्यांदा 88 हजार 964 मते घेउन विजयी झाले होते. 1985 मध्ये एस कॉंग्रेसचे अमानुल्ला मोतीवाला होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT