Election sakal
मराठवाडा

उस्मानाबाद : जिल्हा बँकेसाठीही महाविकास आघाडी?

सूत्रांची माहिती : उस्मानाबाद येथे भाजप ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा लेली असून, लवकरच सर्वांची एकत्रित बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून एका गटाशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी त्यावर उघडपणे सध्यातरी कोण बोलताना दिसत नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत भाजप ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत दिसत आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत २५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ३२५ अर्जांची विक्री झाली. पक्षीय पातळीवर आघाडी किंवा स्वबळ याचा निर्णय झालेला दिसत नाही. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये आता बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रमुख नेत्यांमध्ये चर्चादेखील झाल्याची माहिती आहे. २४ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने उर्वरित तीन दिवस काय घडामोडी घडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेमध्ये पंधरा संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठी ८०५ मतदार आहेत.

दरवर्षी पक्षीय पातळीवर शिवसेना-काँग्रेस हे आघाडी करत होते. राज्यस्तरावर महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजप विरोधात महाविकास आघाडी असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. जिल्ह्याचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील हे आता भाजपत गेल्याने त्यांच्या विरोधकांनी पुन्हा मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेसाठी आमदार प्रा. तानाजी सावंत यांची भूमिका महत्त्वाची असणार आहेत. महाविकास आघाडीऐवजी प्रा. सावंत जिल्हा परिषदेसारखी वेगळी चूल मांडणार का, याकडे भाजपाच्या नजरा असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT