funeral via video call
funeral via video callsakal

मातृभूमीच्या सेवेसोबत पितृभक्ती! वडिलांचे व्हिडिओ कॉलद्वारे घेतले अंत्यदर्शन

उधमपूर येथे सैन्य दलाचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलाने कर्करोगामुळे मृत्यू झालेल्या वडिलांचे व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन घेत साश्रूनयनांनी श्रद्धांजली वाहिली
Published on

पहूर : जम्मूमधील उधमपूर येथे सैन्य दलाचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलाने कर्करोगामुळे मृत्यू झालेल्या वडिलांचे व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन (funeral via video call)घेत साश्रूनयनांनी श्रद्धांजली वाहिली. मातृभूमीच्या सेवेसोबतच पितृभक्ती जपणाऱ्या या तरुणाच्या पितृवियोगाने उपस्थितांची मने हेलावली.

funeral via video call
कोल्हापूर : कारवाईने उतरवला ‘एलसीबी’चा रुबाब

पहूर येथील लेलेनगरातील सुकलाल चिंतामण भोई (वय ५६) यांना कर्करोग झाल्याने त्यांना मुंबई येथे टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच गुरुवारी (ता. २०) सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले.गरिबीत जीवन जगत मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय सांभाळून त्यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मोठा मुलगा फकीरा नवी मुंबई येथे पोलिस दलात कार्यरत आहे, तर शरद भारतीय सैन्यात सीमा सुरक्षा दलात प्रशिक्षण घेत आहे.

funeral via video call
Uttarakhand Election : मंत्री रावत यांची काँग्रेसमध्ये वापसी

गेल्या वर्षी मार्चमध्ये तो सैन्यात भरती झाला. सप्टेंबरमध्ये तो आई- वडिलांना भेटून गेला होता. दरम्यान, वडिलांचे उपचारादरम्यान कर्करोगामुळे मुंबईत निधन झाल्याचे समजताच शरदला अंत्यसंस्कारासाठी गावी येता येणे शक्य नसल्याने त्याने व्हिडिओकॉलद्वारेच वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन साश्रूनयनांनी श्रद्धांजली वाहिली. मातृभूमीच्या सेवेसोबतच पितृभक्ती जपणाऱ्या या तरुणाच्या सहवेदना पाहून उपस्थितांनाही गहिवरून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com