दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवास, सातपुड्यातील आदिवासींची व्यथा

सावऱ्या दिगरला १७ वर्षांपासून पूल रखडला
tribals of Satpuda
tribals of Satpudasakal

तळोदा : सातपुड्यातील सावऱ्या दिगर येथील आदिवासींचे रस्त्यांचे व पुलाचे ग्रहण सुटता सुटत नसून पुलाअभावी आजही या भागातील महिला व पुरुषांना नदीमधून चिखल तुडवत जावे लागत आहे. याचा प्रत्यय नुकताच धडगाव तालुक्यातील सावऱ्या दिगर येथील एका ५५ वर्षीय महिलेला दळण दळण्यासाठी बिलगाव येथे नदीमधून जाताना आला. तिचा तोल जाऊन तिच्यासह दळणही पाण्यात पडले. सावऱ्या दिगर व परिसरातील नागरिकांना नियमित दळणासाठी चिखलाची वाट तुडवत बिलगावला जावे लागते.

tribals of Satpuda
मातृभूमीच्या सेवेसोबत पितृभक्ती! वडिलांचे व्हिडिओ कॉलद्वारे घेतले अंत्यदर्शन

त्यामुळे सुस्त प्रशासन येथील १७ वर्षांपासून रखडलेला पुलाचा प्रश्न कधी मार्गी लावेल, असा प्रश्न उपस्थित करून नूतन महिला जिल्हाधिकारी यांनी तरी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.सावऱ्या दिगर येथील सुना फुगदा पावरा ही ५५ वर्षीय महिला आपल्या गावाहून डोक्यावर जवळपास २५ ते ३० किलो धान्य बिलगाव येथे दळण दळणासाठी जात होती. परंतु रस्त्याअभावी ती गावाजवळील नदीमधून चिखल तुडवत जाताना चिखलात तिचा तोल गेला व डोक्यावरील धान्य पाण्यात पडून भिजले. तिच्या सारख्या अनेक स्त्रिया, मुली व पुरुषांना दळण दळणासाठी अशाच प्रकारे नदीमधून चिखल तुडवत बिलगावला जावे लागते. ही परिस्थिती सुस्त सरदार सरोवर प्रशासनामुळे आल्याचा आरोपही येथील नागरिकांनी केला आहे. या गावातील काही पाडे सरदार सरोवरामुळे बुडितात गेल्याने शासनाने त्यांचे पुनर्वसन केले. परंतु इतर पाडे बुडितात जात नाहीत तर पाण्यामुळे टापू होतात. त्यामुळे आमचेही पुनर्वसन करा, अशी मागणी त्यांची आहे. मात्र शासनाने त्यांचे पुनर्वसन नाकारले.

tribals of Satpuda
Uttarakhand Election : मंत्री रावत यांची काँग्रेसमध्ये वापसी

त्यात २००५ ला भिंगारे समिती स्थापन केली होती. यातील तज्ज्ञांनी पाहणी करून गावाचे पुनर्वसन न करता दळण वळणासाठी रस्ता व पूल बांधून दिला तर प्रश्न सुटेल, असा अहवाल दिला. परंतु १७ वर्षांनंतर अजूनही नदीवर बांधलेला पूल अर्धवटच आहे. प्रत्येकवेळी जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत तेथील आदिवासी सावऱ्यादिगरच्या पुलाबाबत प्रश्न उठवितात. तेवढ्या पुरते प्रशासन खोटे आश्वासन देऊन वेळ मारून नेते. आदिवासींची रस्त्याची ही बिकट वाट कधी पूर्ण होईल, असा संतप्त सवाल आदिवासींनी उपस्थित करून निदान पावसाळ्यापूर्वी तरी नूतन जिल्हा प्रशासनाने मार्गी लावण्यासाठी ठोस प्रयत्न करावे. अशी मागणी केली आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com