औरंगाबाद - बीबी-का-मकबऱ्याची दुरवस्था दाखविणारे छायाचित्र.
औरंगाबाद - बीबी-का-मकबऱ्याची दुरवस्था दाखविणारे छायाचित्र. 
मराठवाडा

मकबऱ्याची डागडुजी कधी होणार सुरू?

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - पर्यटकांचे शहरातील प्रमुख आकर्षण असलेल्या बीबी-का-मकबरा या ऐतिहासिक वास्तूची डागडुजी कधी सुरू होणार, हा प्रश्‍न आता पुन्हा विचारला जात आहे. केवळ आश्‍वासनांचे घोडे दामटणाऱ्या भारतीय पुरातत्त्व विभागाने महासंचालकांनी दिलेली मुदत उलटूनही अद्याप कामाला सुरवात केलेली नाही.

औरंगाबादेत येणारा पर्यटक बीबी-का-मकबऱ्याला भेट दिल्याशिवाय राहत नाही. मात्र, या ऐतिहासिक वास्तूचे पुरातत्त्व विभागाने चालवलेले हाल ‘सकाळ’ने वारंवार निदर्शनास आणून दिले तरीही त्यावर तत्त्परतेने काम होताना दिसत नाही. मकबऱ्याच्या भिंतींचा गिलावा अनेक ठिकाणी गळून पडत आहे. घुमटावर आणि कारंजांच्या हौदांमध्ये झाडे उगवली आहेत. घुमटाचे संगमरवरी दगड निखळत आहेत. बगीचातील पदपथांवर शहरातल्या रस्त्यांसारखेच खड्डे पडले आहेत.

मकबऱ्याची दुरवस्था पाहून संतापलेल्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या महासंचालक उषा शर्मा यांनी डागडुजीच्या कामासाठी दिलेली मुदत कधीच उलटून गेली आहे; मात्र मिनारांना पाईप बांधून ठेवणाऱ्या पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजून निविदा प्रक्रियेतच दिरंगाई चालवली असल्याचे सूत्रांनी सांगितले. डागडुजीला लवकरच सुरवात होईल, असे सांगणाऱ्या अधीक्षकांनीही यावर नंतर काय कार्यवाही करणार, ते अजून गुलदस्त्यात ठेवले आहे. यावर पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT