मराठवाडा

Maratha Reservation : कवठ्यात सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा; अंत्ययात्रेत महिलांचा लक्षणिक सहभाग

अविनाश काळे

उमरगा - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी व मनोज जरांगे-पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी  उमरगा तालुक्यातील कवठा येथे बुधवारी (ता.एक) सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत कवठा गावातील हजारो महिला व पुरुष ग्रामस्थांनी आपला सहभाग घेतला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे व अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी समाजसेवक विनायकराव पाटील यांनी २५ ऑक्टोबर पासून अमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा पाच दिवस आहे. पाटील यांची प्रकृति खालावली आहे. त्यामुळे कवठा ग्रामस्थ व परिसरातील मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत.

बुधवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक प्रतिमा तयार करून ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण गावातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या प्रतिकात्मक अंत्ययात्रेत महिलांचा लक्षवेधी सहभाग होता. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या विविध घोषणा देत तरुण - तरुणीने अंत्ययात्रेत आक्रमक रूप धारण केल्याचे दिसून आले.

गावा बाहेरील वेशीतून हि अंत्ययात्रा लातूर - उमरगा रस्त्यावर नेण्यात आली. त्या ठिकाणी सरण रचून सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमांचे दहन करण्यात आले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी विनायकराव पाटील यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधून आरक्षणाचा लढा शांततेच्या मार्गाने सुरु ठेवण्याचे अवाहन श्री. पाटील यांना केले. तीन नोव्हेंबर पर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास विनायकराव पाटील यांनी जीवंत समाधी घेण्याचा निर्धार केला आहे.

त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बुधवारी पुन्हा संपूर्ण कवठा गावातील ग्रामस्थांनी आपल्या चुली बंद ठेवून पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा दिला. अंत्ययात्रेच्या प्रसंगी एका काळ्या रंगाच्या श्वानाच्या गळ्यात अँड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नावाचा बांधण्यात आलेला फलक विशेष लक्षवेधी होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT