Agitation for Maratha Reservation
Agitation for Maratha Reservation sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला वाढता पाठींबा; मुस्लीम जमात कमेटीनेही दिला पाठींबा

अविनाश काळे

उमरगा - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गुरूवारी (ता. २६) विविध पक्ष संघटना, शिक्षण संस्था व विद्यार्थ्यांच्या वतीने पाठींबा देण्यात आला.

उमरगा येथे तहसील कार्यालयासमोर बुधवारपासुन (ता. २५) साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. उदय मोरे, डॉ. यतिराज बिराजदार, भास्कर शिंदे, खंडू मोरे, राजेंद्र भोसले, बालाजी गायकवाड, मारूती पाटील, बळीराम गायकवाड, प्रताप गायकवाड उपोषणासाठी बसले होते. उपोषस्थळी शांतकुमार मोरे, संताजी चालुक्य, बाळासाहेब माने, शहाजी पाटील, प्रा. व्ही. एम. पाटील, बाबुराव शहापूरे, विवेक हराळकर, उमाकांत माने, सचिन जाधव, अनिल बिराजदार, शरद माने, शाहुराज माने, भूमिपुत्र वाघ, अभिषेक औरादे, नितीन सुर्यवंशी आदीसह विविध मराठा बांधव उपस्थित होते.

दरम्यान युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांनी उपोषणस्थळी थांबुन उपोषणाला पाठींबा दिला. अनिल उर्फ पप्पू सगर, विजय वाघमारे, चंद्रशेखर पवार अभिषेक औरादे आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. गुंजोटीत सुरु असलेल्या उपोषणालाही वाढता पाठींबा मिळत आहे.

भारत शिक्षण संस्थेने दिला पाठींबा

भारत शिक्षण संस्था व त्यांच्या विविध शाखांच्या वतीने उपोषणाला पाठींबा दिला. संस्थेचे उपाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयापासुन प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी रॅली काढून उपोषणस्थळी भेट दिली. या वेळी प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, नितीन कोराळे आदी उपस्थित होते.

मुस्लिम जमात कमेटीने दिला पाठींबा

मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी उमरगा तालुका सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मुस्लिम जमात कमेटीचे पदाधिकारी बाबा औटी, अलिम विजापुरे, रज्जाक अत्तार, कलीम पठाण, मुजीब इनामदार, निजाम व्हंताळे आदींनी उपोषणात सहभागी होऊन पाठिंबा दिला.

उपोषणस्थळी सर्वपक्षीय विद्यमान खासदार व आमदारांना बंदी

उपोषणस्थळी सर्वपक्षीय विद्यमान खासदार व आमदारांना बंदी घालण्यात आल्याचे फलक लावण्यात आले आहेत तर तुरोरी, तुगाव, मुरूम, वागदरी, कोराळ, नाईचाकुर, कवठा, नारंगवाडी, तलमोड, गुगळगाव, कदेर, गुंजोटी, मातोळा, चिंचोली (ज), मुळज, पेठसांगवी आदी गावात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.

कवठा ग्रामस्थांचा 'चुल बंद' आंदोलनाचा निर्णय

सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवठा येथुन ग्रामस्थांनी दुचाकी फेरी काढून नायब तहसीलदार रतन काजळे यांना निवेदन दिले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शनिवारी (ता. २८) कवठ्यात 'चुल बंद' आंदोलन करण्यात येणार असुन स्वतः श्री. पाटील कवठा सेवाग्राम येथे आमरण उपोषण करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT