Dr. Ashok Tejankar
Dr. Ashok Tejankar 
मराठवाडा

मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. अशोक तेजनकर

अतुल पाटील

औरंगाबाद : देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र - कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी नियुक्तीपत्र दिले आहे.

डॉ. तेजनकर यांना शिक्षण, प्रशासन, भूगर्भ संशोधन क्षेत्रात २८ वर्षांचा अनुभव आहे. तसेच  जल क्षेत्रात त्यांचे १० महत्वाचे संशोधन प्रकल्प आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या संशोधनाला मान्यता मिळाली आहे. भारत सरकारच्या स्‍कील इंडिया प्रकल्प आणि महाराष्ट्र - इस्राईल जलनियोजन समितीवरही त्यांनी कार्य केले आहे.

प्र-कुलगुरूपदासाठी कुलपती सी. विद्यासागर राव यांनी 27 सप्टेंबर 2017 रोजी राजभवनात डॉ. तेजनकर यांची मुलाखत घेतली होती. तीन जणांमधून त्यांची निवड झाली आहे.

डॉ. तेजनकर हे मशिप्र मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात १३ वर्षापासून कार्यरत आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाणारा स्वभाव असल्याने विद्यापीठाच्या गुणवत्तेसाठी अग्रेसर राहतील.

मराठवाड्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासनाला सोबत घेऊन काम करणार आहे. ही निवड सार्थ ठरविण्यासाठी कठोर परिश्रम घेईल.
- डॉ. अशोक तेजनकर, नवनियुक्त प्र- कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT