मराठवाडा

प्रमाणपत्र दिलेल्या शेतकर्‍यांचे नाव कर्जमाफीच्या यादीतच नाही!

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : कर्जमाफीच्या प्रमाणपत्राचे वाटप मोठ्या दिमाखात जिल्हाधिकारी कार्यालयात (ता. 18 ) पार पडले. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतक-यांची ग्रीन लिस्ट प्रदर्शित करण्यात आली. सत्कार करुन ज्या शेतक-यांना प्रमाणपत्र दिले अशा एकाही शेतक-यांचे नाव या ग्रीन लिस्टमध्ये नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हावार प्रमाणपत्र वाटपाची घाई केल्याने सहकार विभागावर नामुष्की ओढवली आहे. 

कर्जमाफी केल्याचे मोठ्या जल्लोषात घोषणा झाली; पण घोषणेनंतर प्रत्यक्ष कर्जमाफी मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्र्यासह, सहकारमंत्री यानी कर्जमाफी दिवाळी अगोदर देण्यात येईल असे सांगितले. त्यातही प्रक्रियेला उशीर लागल्याने दिवाळीच्या निमित्ताने ही कर्जमाफी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी जाहीर केले. गेल्या बुधवारी पात्र शेतक-याची ग्रीन लिस्ट जिल्हावार येणार असल्याचे सांगण्यात आले. या ग्रीन लिस्टमधून जिल्ह्यातील पन्नास शेतक-यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम घेण्याचे नियोजन करावे असे आदेश सहकार विभागाने जिल्हा उपनिबंधकांना दिले. त्याप्रमाणे ग्रीन लिस्टची वाट जिल्हा उपनिबंधकानी पाहिली पण सत्कार करण्याच्यावेळेपर्यंत ही यादी आली नाही.

कार्यक्रम करण्याच्या सूचना असल्याने, अशा पात्र लोकांची यादी जिल्हास्तरावरच काढली. यादीमध्ये पन्नास ऐवजी 23 जणांचा समावेश कऱण्यात आला. या यादीतील दोन शेतक-यांना मुंबईतील मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्र घेण्यासाठी पाठविण्यात आले, तर जिल्हाधिकारी कार्यालयात सहपालकमंत्री महादेव जानकर, आमदार सुजीतसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते 21 शेतक-यांना बुधवारी (ता. 18 ) प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

दुस-याच दिवशी शासनाने आपले सरकार पोर्टलवर ग्रीन लिस्ट प्रदर्शित केली. दोन दिवसाच्या सुट्ट्यानंतर सहकार कार्यालयाने जिल्ह्यातील लाभ मिळालेल्या व सत्कार केलेल्या शेतक-यांची नावे शोधण्यासाठी ग्रीन लिस्ट पाहिली तेव्हा एकाही शेतक-यांचे नाव या यादीत दिसले नाही.

कार्यक्रम तर  मोठ्या दिमाखात पार पडला पण पात्र शेतक-यांची नाव पहिल्या यादीत नसल्याने जिल्हा सहकार कार्यालयावर चांगलीच नामुष्की ओढावली. ही बाब शासनाला कळविली, असता अशा लोकांची यादीही पाठवून देण्याच्या सूचना स्थानिक कार्यालयाला दिली आहे.

मुहुर्तावर कार्यक्रम आटोपण्याच्या खटाटोपामध्ये सहकार विभागाची चांगलीच अडचण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

CSK vs SRH Live IPL 2024 : दोन हेवी वेट संघ भिडणार, विनिंग ट्रॅकवर कोण परतणार?

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

SCROLL FOR NEXT